Home बुलडाणा देऊळगाव माळी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. एकीने राहा...

देऊळगाव माळी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. एकीने राहा पण नेकीने राहा – प्रा. विजय राजगुरू

216

देऊळगाव माळी – कैलाश राऊत

6 डिसेंबर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्त देऊळगाव माळी येथे विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम वार्ड क्रमांक पाच मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, वार्ड क्रमांक दोन व विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते नारायण बळी साहेब, (सेवानिवृत्त शाखा अभियंता जलसंपदा विभाग मेहकर) अध्यक्ष संत रोहिदास शिक्षण संस्था,प्रा.विजय राजगुरू सर,सामाजिक कार्यकर्ते तथा चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ डोंगरे,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ बाहेकर सर , सामाजिक कार्यकर्ते भास्करराव गवई साहेब ,लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी गजेंद्र भाऊ गवई, कुंभार समाजाची युवा प्रदेशाध्यक्ष पत्रकार कैलास राऊत, बोरकर साहेब, भिकाजी गवई, दत्ता गवई सर, व महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी प्राध्यापक विजय राजगुरु सर, नारायण बळी साहेब, पत्रकार कैलास राऊत, भास्कर गवई साहेब, बोरकर साहेब इत्यादी मान्यवरानी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला व समाजाने आज एकीने रहा पण एकीने रहा हा संदेश मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिला, वरील सर्व ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विश्वशांती बुद्ध विहाराच्या पदाधिकाऱ्यांसह युवा वर्गाने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी गजेंद्र गवई यांनी केले.