Home महत्वाची बातमी चिखली मुस्लिम कब्रिस्तान मध्ये होत असलेले काम इस्टीमेटनुसार करण्यात यावे .

चिखली मुस्लिम कब्रिस्तान मध्ये होत असलेले काम इस्टीमेटनुसार करण्यात यावे .

110
0

 

नागरिकांची मागणी

चिखली: – नगर परिषद चिखलीच्या वतीने स्थानिक जुना गाव मुस्लिम कब्रिस्तान मध्ये गट्टू बसविण्यात येत आहेत पण हे काम एस्टीमेट प्रमाणे होत नसून काळी माती व मुरूम टाकून गट्टू बसविने सुरू आहेत, त्यामुळे सदर काम इस्टीमेट नुसार करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी मुख्याधिकारी न.प. चिखली यांना दि 7 डिसेंबर रोजी देण्यात आले असून मुख्याधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनानुसार – नगर परिषद चिखलीच्या वतीने स्थानिक जुना गाव मुस्लिम कब्रिस्तान मध्ये गट्टू बसविण्यात येत आहे मात्र सदर काम मंजुर इस्टीमेट नुसार करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांव्दारा करण्यात येत आहे. संबधीत ठेकेदार काळी माती व त्यावर मुरुम टाकून गट्टु बसविण्याचे काम करीत असून अतिशय नित्कृष्ठं दर्जाच्या या कामामुळे पहिल्याच पावसात मुरुम व माती दबुन शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. त्यामुळे सदर काम इस्टीमेटप्रमाणे खडीकरण करून मुरूम टाकून रोलर च्या साहाय्याने दाबल्यानंतर चुरी टाकून गट्टू बसविणे अशा प्रकारे करण्यात यावे अशी मागणी नागरिकांव्दारा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सदर काम इस्टीमेटनुसार करुन घेण्यास न प प्रशासन असमर्थ असेल तर काम रद्दं करण्यात यावे कारण कब्रस्थानमध्ये दफनविधीला जागा आवश्यंक असते रस्ता नाही अशी भुमिका घेत निवेदनकर्त्यांनी मागण्या मान्यं न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनावर देण्यात आला आहे. निवेदनावर ऊबेद अली खान उर्फ भाईजान,
डाॅ मोहम्मद ईसरार,
हाजी फारूख अली खान,सलीम मेमन, मलीक जमदार,सलीम मनीयार,हाजी रऊफ बाबू , ज़का ठेकेदार,हाजी तालिब खान, नईम जमादार, गयास बागबान, मोबीन मिया,सादिक जमादार,खालिद पठान,हाजी हनीफ बावा, राज़िक जमादार, अज्जू खान,रफीक भाई पाटा, बासित जमादार,अजहर इमरान, सै फहीम, दिलनवाज खान,एजाज शाह,शौकत महण्यार,आजम बागबान,शेख अज़ीज़, बाबू भाई,अफसर खान, शेख तौफीक, इरफान अली खान, साबिर शाह,रऊफ मिया,शादाब सिद्दीकी,अकबर,बाबू जमादार,रब्बानी महन्यार, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.