
खडकपूरणा धरणाच्या पाटाला अनेक ठिकाणी पडल्या भेगा.
सिंचन विभागाचे दुर्लक्ष ..
- मेरा खुर्द प्रतिनिधी फोटो.
त्यावरून सरळ पायीचालता येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे..
खडकपूर्णा प्रकल्प द्वारे तयार करण्यात आलेल्या पाटा द्वारे रब्बीसाठी पाणी सोडण्यात येणार असून या पाटावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. या पाक ठिकाणी मोठाल्या भेगा पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
तालुक्यातील शेती हिरवीगार व्हावी शेतकरी समृद्ध होऊन त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने काही वर्षांपूर्वी देळगाव राजा तालुक्यातील संपूर्ण अंतर्गत मेरा शिवारात पाठाचे काम करण्यात आले परंतु आजपर्यंत या पाठात खडकपूर्णा प्रकल्प पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आशा आहे की यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी का होईना मात्र याच्यात पाणी सोडावे अशी अपेक्षा आहे. मेरा सोला शिवारातील हा पाठ मेरा मार्गे दरेगाव शेंदुर्जन शिवारात जात आहे हे पाठ झाल्याने अनेक गावाचे शिवार रस्ते सुद्धा यामध्ये गेल्याने शेतकऱ्यांना शेतातून माल घरी अणयाकरिता मोठी कसरत करावी लागत असुन यामध्ये मोठे मोठे झाडंझुडपंनी कळस गाठला असून भेगा पडल्याने अक्षरश या पाठाची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती मात्र आता सोयाबीनची काढणी झाली असून आता चना गहू कांदा शाळु रब्बी पिके घेण्यासाठी शेत शिवार तयार करीत आहे.
चिखली तालुक्यातून काही अंतरावरू असलेल्या खडक पूर्ण धरणातून रब्बीसाठी अजुनी पाणी सोडण्यात आले नाही. गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाठ तयार करण्यात आले मात्र याच्या पाणी झाले नसल्याने शेतकऱ्यांचे पीक गेले आहे. यावर्षी पाणी येईल का याची वाट पाहात आहे.
सध्या शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत असून रब्बीच्या पिकाला पाणी मेळावा यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाच्या मेरा असोला शिवारातून जाणाऱ्या पाटात पाणी सोडण्यात यावे मात्र रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सिंचन विभागाने या पाठाची दुरुस्ती करून पाणी सोडण्यात यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
खडकपूर्णाचे पाटा अनेक ठिकाणी फुटुन भेगा पडुन पाटात झाडी झुडपं वाढल्याने पाणी सोडता वेळी अनेक अडचणीला तोंड द्यावे लागणार हे विशेष शेतकरी रब्बीचे पीक घेण्यासाठी सिंचन विभागाने वेळेवर पाणी सोडून पिके घेण्यासाठी पाण्याची मदत करावी अशी मागणी होत आहे.











































