
मंगरूळ येथे पोलिसांनी धाड टाकून६९ हजारांची दारू पकडली
हनिफ शेख ,
अंढेरा प्रतिनिधी.
मंगरूळ हे गाव दोन तालुके तर एक मंगरूळ खुर्द जाफराबाद तालुक्यात येत असून तर मंगरूळ बुद्रुक चिखली तालुक्यात येत असुन हे दोन्ही गावा हक्काच्या अंतरावर आहे जुळणारा गाव असून या दोन्ही गावांच्या मध्ये फक्त एक नदी आहे तर एक मंगरूळ मराठवाड्यात येतो हे दोन्ही मंगरूळ मराठवाडा आणि विदर्भ जोडणारे गाव आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे हे बरेच दिवसांपासून दारूचा महापूर वाहत होता गुप्त माहिती अनुसार अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
३१*८*२०२०* च्या सायंकाळी पाच वाजता ही कारवाई करण्यात आली आहे
मंगरूळ हे गाव चिखली तालुक्यात शेवटच्या टप्प्यावर असल्याने येथील राजू किसन काकडे हे आपल्या राहत्या घरात अवैध देशी दारू विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच अंढेरा पोस्टचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार. मोहन पाटील व त्यांचे पोलीस स्टॉप यांनी धाड टाकली असता देशी दारूचे. २३. बॉक्स दारू पकडण्यात आली असून त्याची किंमत.६९. हजार रूपये असून आरोपी पळून गेला असून पुढील तपास सुरू आहे
घ गाव मंगरूळ येथे ही कारवाई करण्यात आली आहे . यावेळी. मोहन पाटील निवृत्ती पोफळे समाधान झीने. लहाने वाघमारे यांनी मोठ्या फुरताईने. कारवाई करण्यात आली.
( गावातली अवैध दारू विक्री बंद करण्या साठी महिला शक्ती पुढाकार घेण्याचे निर्माण झाली आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून युवा पिढी दारू कडे वळत यामुळे येणारे पिढीची भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहे)











































