Home बुलडाणा चाकूच्या धाकावर शिक्षक पती पत्नीला चोरट्यानि लुटले ,

चाकूच्या धाकावर शिक्षक पती पत्नीला चोरट्यानि लुटले ,

1017

चाकूच्या धाकावर शिक्षक पती पत्नीला चोरट्यानि लुटले ,

परिसरात उडाली खळबळ ,

मेरा फाट्यावरील घटना

चोरटे फरार शोध सुरू,

 

हनिफ शेख

अंढेरा ,

साखर खेर्डा येथील रहिवासी शिक्षक समाधान भुसारी हे आपल्या पत्नी सह मंगळवारी रात्री पालघर येथून साखर खेर्डा येथे येण्यासाठी मेरा फाट्यावर गाडी ची वाट पहात असतांना थांबले होते अचानक तिथे काही चोरटे आले व त्यांनी या जोडप्यास चाकू चा धाक दाखवून मोबाईल सोने चांदी चे दागिने लुटून पोबारा केला असल्याची घटना घडली असून या प्रकरणी आज बुधवार रोजी अंढेरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून मिळालेल्या माहिती नुसार साखर खेर्डा येथील रहिवासी समाधान भुसारी 28 हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे शिक्षक पदावर कार्यरत आहे ते महालक्ष्मी सण असल्यामुळे आपल्या गावी साखर खेर्डा येथे येण्यासाठी निघाले औरंगाबाद येथून देवळगावराजा पर्यंत ते आले पुढे बस नसल्यामुळे ते एक इंडिका गाडीने मेरा फाट्यावर रात्री 9 30 च्या सुमारास उतरले त्यांना घेण्यासाठी त्यांचा साला व मावस भाऊ मेरा फाट्यावर येणार होते त्यांची वाट पहात असतांना ते फाट्यावरील स्वीट मार्ट समोर उभे होते इतक्यात तिथे दोन युवक आले व कुठे जायचे आहे अशी विचारणा केली व निघून गेले दहा मिनिटां नंतर पुन्हा हे दोघे मोटर सायकल चालक युवक आमच्या जवळ आले व त्यांनी मला माझा मोबाईल मागितला इतक्यात दुसर्याने माझ्या पत्नीच्या गल्याला चाकू लावून पर्स व गळ्यातील मंगळसूत्र व माझा पर्स हातातील चांदीचा ब्रेसलेट घेऊन ते तिन्ही चोरटे देवळगाव म्हि च्या दिशेने फरार झाले दोन मोबाईल सोन्याचा मंगळसूत्र दोन्ही प्रस अंदाजे 74 हजाराचा माल लुटून नेला आहे या प्रकरणी समाधान भुसारी यांच्या फर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे धर्मीयां न घडलेल्या घटने मूळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मेरा फाट्यावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मंगणी केली जात आहे ,