Home विदर्भ काकू ला प्रियकराशी बोलतांना पुतणीने पाहिले अन , विपरितच घडले , ???

काकू ला प्रियकराशी बोलतांना पुतणीने पाहिले अन , विपरितच घडले , ???

3063

 

 

अमीन शाह ,

नागपूर : काकूच्या अनैतिक संबंधाची कुणकूण १५ वर्षांच्या पुतणीला लागली. तिने कुटुंबीयांना सांगून भंडाफोड करू नये म्हणून काकू व प्रियकराने पुतणीला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना नंदनवनमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काकूसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती (वय १५) ही आई-वडिलांसह नंदनवनमध्ये राहते. वडील दारूडे आहे तर आई गृहिणी आहे. ती संयुक्त कुटुंबात राहते. आरती दहावीची विद्यार्थिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून काकू योगिनी (३४) ही एका युवकाशी वारंवार बोलताना दिसत होती. तो युवक योगिनीचा प्रियकर असल्याची कुणकुण आरतीला लागली.
दोनदा काकूला प्रियकराशी बोलताना आरतीने पकडले होते. त्यामुळे योगिनी घाबरली होती. आरती हिने काकाला आणि कुटुंबीयांना सांगितल्या तर मोठा घोळ होईल, व आपल्या प्रेम प्रकरणाची वाच्यता होईल अशी भीती योगिनीला होती. त्यामुळे तिने आणि तिच्या प्रियकराने आरतीचाच काटा काढण्याचा प्लान बनवला आणि पुढील घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास आरती बाथरूमला जात होती. त्यावेळी योगिनी आणि तिचा प्रियकर घरासमोर बोलत बसले होते. दोघेही आरतीला दिसले. त्या नंतर तिच्या काकूने आरतीच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केला. ती बेशुद्ध पडली. काकू आणि तिच्या प्रियकराने आरतीला घराच्या आवारात असलेल्या विहिरीत उचलून फेकले, असा आरोप आहे.विहिरीच्या खोल पाण्यात आरती गटांगळ्या खाऊ लागली. तिने आरडाओरड केला. आवाज ऐकून तिची आई घरातून बाहेर धावत आली. आरतीने मोटरच्या पाईपला पकडून ठेवले. शेजाऱ्यांच्या मदतीने आरतीला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तक्रारीनंतर नंदनवन पोलिस घरी पोहोचले. आरतीच्या बयाणावरून पोलिसांनी योगिनी व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.