Home विदर्भ सोयाबीन पिकावर खोडकीडीचे आक्रमण

सोयाबीन पिकावर खोडकीडीचे आक्रमण

173
0

सोयाबिन पिक पडले पिवळे , शेतकरी हवालदिल

 

वर्धा  – जिल्हा आष्टि तालुका तळेगांव (शा.पं.) मागील वर्षीच्या हंगामात कपासी पिकाच्या उत्पन्नात झालेली घट त्यातच लाॅकडाऊन मुळे कापुस विक्रिला लागलेला विलंब विशेषत: कपासीला मिळालेला कमी भाव त्यामुळे यावर्षीच्या हंगामात परीसरातील शेतकर्‍यांनी कपासीच्या पेरणीत घट केली असुन सोयाबिन पिक पेरणीला जास्त प्राधाण्य दिले आहे. या हंगामात परिसरात फक्त ४० % टक्केच कपासीचा पेरा असुन ६० % सोयाबीनचा पेरा आहे.

यावर्षी जुनच्या सुरवातीपासुनच पावसाला सुरुवात झाल्याने पेरण्या अगदी योग्य वेळेवर पार पडल्या या हंगामातील उगवलेल्या पिकांची स्थिती सुरवातीपासुनच चांगली असल्याने शेतकर्‍यांनी आंतरमशागतही मोठ्या जोमाने करुन योग्यवेळी खत व फवारणी सुद्धा केली.

एकंदरीत या हंगामातील पिकाच्या परिस्थितीवरुन यावर्षी एकरी आठ ते दहा क्विंटल सोयाबिन पिकाचा उतारा बसेल असे शेतकर्‍यांकडुन भाकीतही वर्तविल्या जात होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापुर्विपासुन परीसरात सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे सोयाबीन पिकावर खोडकिडिने आक्रमन केले असुन शिवाय सोयाबीन पिवळे पडले आहे. तर शेंगा भरण्यापुर्विच वाळत सुद्धा आहे परिणामी, संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रोगांचे आक्रमण तीव्र असल्याने अनेक शेतजमिनी रोगाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामुळे काही दिवसांतच घरी येणारे सोयाबीनचे पीक जागेवरच उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. तळेगाव माैजासह परिसरातील देवगांव, जुनोना खरासी, दुर्गापुर, टेंभा, बंगाला, नागझरी रानवाडी, हरिषवाडा या शिवारासह चिस्तुर, खडका , भिष्णुर बेलोरा, आनंदवाडी, भारसवाडा या शिवारातील सुद्धा सोयाबीन पिवळे पडले असुन पिकांवर अधिक रोग दिसतो.

Unlimited Reseller Hosting