Home विदर्भ घाटंजी पत्रकार संघटनेचा वाढदिवसाचा उपक्रम…!

घाटंजी पत्रकार संघटनेचा वाढदिवसाचा उपक्रम…!

216

यवतमाळ / घाटंजी , दि. २६ :- (तालुका प्रतिनिधी) सतत सर्वांची वार्ता जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी धडपडत असणारा पत्रकार बांधव स्वतःची वार्ता अथवा आपले उत्सव साजरे न करता प्रकाश झोतात न येताच साजरे करतो. मात्र घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजु चव्हाण यांच्या संकल्पनेतून यानंतर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाचे वाढदिवस पत्रकार संघटने कडून घेण्याचा निर्णय घेऊन सर्वप्रथम पत्रकार संघटनेचे सचिव महिंद्रा देवतळे यांचा वाढदिवस तालुक्यातील सर्व पत्रकाराच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

कधी कोण्या नेत्याचा तर कधी अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्रकार बांधव हजेरी लावून त्यांचे वृत्त संकलन करून प्रसिद्धीस देतो मात्र स्वतःचा वाढदिवसाचा तो कधीच विचार करीत नाही स्वतःच्या जीवनाचा आनंद तो कधीच न बघता दुसऱ्याची प्रसिध्दी देवून स्वतःच्या प्रसिद्धीची तो कधीच विचार करीत नाही. या बाबीला हेरून पत्रकार बांधवांमध्ये आनंद संचारावा आपल्याही जीवनाचा त्याने आनंद बघावा यासाठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजु चव्हाण मनात संकल्पना आणून तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराचा वाढदिवस पत्रकार संघटनेकडून साजरा करण्याचे ठरविले आणि दिनांक २५ आगस्ट रोजी पत्रकार संघटनेचे सचिव महिंद्रा देवतळे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात स्थानिक विश्रामगृह येथे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याक्षणी राजु चव्हाण, आकाश बुरे वार, महिंद्रा देवतळे, सागर सम्मनवार, पांडुरंग नीवल, गणेश भोयर, दिनेश गाऊत्रे, सय्यद आसिफ, संतोष पोटपिल्लेवार, कज्जुम कुरेशी, विवेक अक्कल वार, अरुण कांबळे, मुकेश चीव्हा ने, संतोष अक्कलवार, अमोल मोत्तेवार, अमोल नडपेलवार, मलय्या खंडारे, ओम ढवळे, कुणाल तांगडे आदी पत्रकार उपस्थित होते.