Home बुलडाणा कोरोना प्रादुर्भाव पाहता मेहकर उपविभागातील आस्थापनाचे वेळ बदलणार

कोरोना प्रादुर्भाव पाहता मेहकर उपविभागातील आस्थापनाचे वेळ बदलणार

368

औषधी दुकान व दवाखाने सोडून इतर आस्थापनाचा वेळ राहणार सकाळी ९ ते ३ मेहकर उपविभाच्या टास्कफोरर्सच्या बैठकीत झाला निर्णय.

मद्याची दुकाने सुद्धा ९ ते ३ परियांतच उघडी राहणार

जमीन शहा

डोणगाव , दि. ०१ :- मेहकर उपविभाग हा कोरोना पासून दूर होता मात्र गेल्या दोन काही दिवसात मेहकर उपविभागातील मेहकर व लोणार तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा कोरोनाच्या रोकथांब साठी उपाय योजना म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी तथा कोविड टास्क फोर्स प्रमुख गणेश राठोड यांनी बैठक घेतली यात लोणार व मेहकर कोविड टास्क फोर्सचे सर्व सदस्य हजर होते यात मेहकर व लोणार तालुक्या पासून कोरोना दूर ठेवण्या साठी उपाय योजनावर शिक्का मोर्तब करण्यात आला.
उपविभागात तालुक्यातील लोणार व मेहकर हे कोरोना प्रादुर्भाव पासून दूर होते मात्र मागील काही दिवसात या दोन्ही तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा पुन्हा दोन्ही तालुके कोरोनामुक्त राहावे यासाठी कोविड टास्क फोर्स प्रमुख गणेश राठोड यांनी ३० जून रोजी टास्क फोर्सची बैठक घेतली यात विनाकारण बाहेर फिरणार्यांना मज्जाव करण्या साठी मोटार सायकलवर डबलसीट व तीब्बल सीट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही,विना परवाना गावात येणाऱ्या वाहनावर कार्यवाही,विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही,दवाखाने व औषधी दुकान आणि कृषी केंद्र या व्यतिरिक्त सर्व आस्थापना( दुकाने) ह्या सकाळी ९ ते ३ वाजे परियानंत सुरू असणार त्या नंतर जी आस्थापने सुरू राहतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे बँकांच्या मध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण साठी होमगार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे तर कोविड सेंटर साठी ज्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत त्यांच्या नेमणूका सुद्धा सुरू होणार आहेत.
मोठ्या शहरांमध्ये भाजी बाजार हा सोशल सामाजिक अंतर पाहता वेगवेगळ्या भागात ठेवला जाणार आहे तर दोन्ही तालुक्या मधील रोड वरील गावात असलेले फळांची दुकाने ही रोड वरून काढून टाकली जाणार आहेत जेणेकरून बाहेर गावावरून येणाऱ्या जाणारी वाहने थांबणार नाही ज्याने कोरोनाचा धोका सुद्धा कमी होईल विना मास्क व्यवसाय करणाऱ्या दुकांदारावर सुद्धा कार्यवाही केल्या जाईल.
मेहकर व लोणार तालुक्या मधून कोरोना हद्दपार करण्या साठी टास्क फोर्स मधील प्रशासनिक अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका चोख वाजवावी या साठी उप विभागीय अधिकारी तथा टास्क फोर्स प्रमुख गणेश राठोड यांनी बैठक घेतली यात ,तहसीलदार डॉ संजय गरकल,लोणार तहसीलदार सेफन नदाफ,तालुका वैधकीय अधिकारी डॉ महेंद्र सरपाते,गट विकास अधिकारी मेहकर आशिष पवार,लोणार गट विकास अधिकारी,उप विभागीय पोलीस अधिकारी तडवी,मेहकर ठाणेदार आत्माराम प्रधान,मेहकर ग्रामीण रुग्णालय वैधकीय अधिकारी डॉ ठोंबरे,लोणार ,डोणगांव, जानेफल, येथील ठाणेदार हे सर्व हजर होते.