Home बुलडाणा टिक टॉक स्टार म्हणतो अत्ता देशी अँपवरच विडिओ अपलोड करेन…!

टिक टॉक स्टार म्हणतो अत्ता देशी अँपवरच विडिओ अपलोड करेन…!

203

दुःख फक्त एव्हढच की ज्या लाखो लोकांच्या सोबत जुळलो होतो पुन्हा नव्याने दुसऱ्या अँपच्या माध्यमाने त्या चाहत्या सोबत जुडावे लागेल.

चार महिन्यात १ मिलियन लाईक आणि एक लाख ७ हजार चाहते जुळले होते प्रमोद शिंगणे सोबत.

जमीर शहा

डोणगांव – चायनीज अँप टिक टॉक वरती सध्या शहरा पासून खेड्या परियानंत प्रत्येकजण आपले अकाउंट काढत होता तर काहींना त्याची लत लागली होती त्यावर तासंतास घालवणे आणि ज्यांच्या अंगात कला आहे अश्या कलाकारांना एक स्टेज या माध्यमातून मिळाला होता मात्र देशाच्या सुरक्षे पुढे काहीही नाही चीनला त्याची औकात दाखवण्या साठी भारत सरकारने ज्या ५९ चिनी अँप बंद केल्या त्यात टिक टॉक सुद्धा आहे यात आपल्या कडील कलावंत सुद्धा टिक टॉक सोडणार मात्र आपली कला अत्ता ते भारतीय अँप च्या माध्यमातून दाखवतील.

शहरात नव्हेतर गावात सुद्धा देशी स्टार टिक टॉक वरती आपली कला दाखवत होते त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा होता अश्यात भारत सरकारने चीनला धडा शिकवण्या साठी टिक टॉक सारख्या ५९ चिनी अँप भारतात बंद केल्या तेव्हा चिनी अँपच्या माध्यमाने आपली कला सादर करणारे कलाकार देशासाठी आपल्या कडून हे बलिदान आहे अशी त्यांची इच्छा ते बोलून दाखवत आहे डोणगाव पासून जवळच असलेल्या स्मार्ट ग्राम पंगरखेड येथील प्रमोद शिंगणे याने ४ महिन्या पूर्वी टिक टॉक वर आपले अकाउंट बनवले त्यावर सहाशे पेक्षा जास्त विडिओ अपलोड केले तेव्हा त्याचा एक चाहता वर्ग बनला त्याचे फॉलोवर १ लाख ७ हजार पेक्षा जास्त आहेत तर १ करोड पेक्षा जास्त लोकांनी त्याला पसंदी सुद्धा दिली अश्यात तो एक स्टार झाला होता मात्र शासनाने चिनी अँपला बंदी घातली तेव्हा अश्या अनेक कलाकारांनी टिक टॉक सोडून आपल्या देशातल्या देशी अँपच्या माध्यमातून आपली कला लोकांच्या समोर आणायचे ठरवले या साठी यु ट्यूब सारखे माध्यम सुद्धा वापरावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.
देशासाठी आपल्या कडून टिक टॉक सारख्या चिनी अँप्पला सोडून देशप्रेम दाखवण्याचे हे एक उत्तम मार्ग आहे जो माझा चाहता वर्ग होता तो मिळेल की नाही हेच एक दुःख आहे मी पुन्हा देशी अँपच्या माध्यमातून माझी कला लोकांच्या समोर आणेल प्रमोद शिंगणे