Home बुलडाणा मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज घरी राहून अदा करावी तसेच संपूर्ण जग...

मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज घरी राहून अदा करावी तसेच संपूर्ण जग कोरोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करावी , दाऊद सेठ कुरेशी

231

अमीन शाह

बुलडाणा : मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज घरी राहून अदा करावी तसेच संपूर्ण जग कोरोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करावी असे आवाहन दाऊद सेठ कुरेशी यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे सध्या मुस्लिम समाज चा पवित्र असा रमजान महिना सुरु आहे व २५ मे रोजी रमजान ईद साजरी होत आहे या पार्शवभूमीवर सदर आवाहन करण्यात आले. आहे.

दाऊद सेठ कुरेशी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि “प्रथमता सर्व माझ्या महाराष्ट्र राज्यातील आणि सर्व मुस्लिम समाजातील लोकांना ईद मुबारक, इतिहासात असं कधी घडलं नाही एका कोरोना आजारामुळे संपूर्ण जगावर भीतीचे सावट पसरले असताना मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांचे धन्यवाद व्यक्त करतो की या पवित्र रमजान महिन्यात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले आणि सर्वात महत्त्वाचे रमजान ईद 25 तारखेला आहे या ईद करिता मुस्लिम समाजाने ईद ची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांनी गरिबांना मदत करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला खूप ठिकाणी मुस्लिम बांधव गरजूंना मदत करताना आपणास दिसत आहेत या सर्व मुस्लिम समाजाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कोरोना मुळे संपूर्ण देशावर महामारी के संकट आहे अशा परिस्थितीत या कोरोना आजार विरोधात आमचे कोरोना योद्धा प्रशासनात कार्यरत असलेले सर्वच पोलीस बांधव, डॉक्टर्स ,नर्सेस ,सफाई कामगार आणि प्रत्येक कर्मचारी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या तर्फे सर्वांना ईद मुबारक मी सर्व मुस्लिम समाजाला आव्हान करतो की सर्वांनी या देशावर चे कोरोना चे संकट दूर होण्यासाठी ईदची नमाज घरी अदा करून संपूर्ण जगाला या कोरोना महामारी पासून मुक्ती मिळावी याकरिता दुवा ( प्रार्थना ) करावी आणि देशात सर्वांनी शांतता आणि बंधुता ठेवावी तसेच मी कोरोना आजाराचे हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद असा संदेश सामाजिक कार्यकर्ते दाऊद सेठ कुरेशी यांनी दिला