Home बुलडाणा सावारगावमाळ च्या दरम्यान मजूर महिलेची अंबुलन्स मध्येच झाली  प्रसुती

सावारगावमाळ च्या दरम्यान मजूर महिलेची अंबुलन्स मध्येच झाली  प्रसुती

142

अन , बुध्दु धावला मदतीला ???

अमीन शाह

सिंदखेडराजा ,

जालना जिल्ह्यातील अंबड वरुन खांडवा मध्यप्रदेश कडे बळीराम राऊत पञकार , रुख्कमीनी नंदु पाटील हे अंबुलन्स ने निघाले होते सदर अंबुलन्स सावरगावमाळ जवळ पोहचताच गाडीमधेच गरोदर असलेली महिलेची प्रसुती झाली सदर माहिती नेहमी प्रमाणे २४ घंटे अंबुलन्स प्रमाणे काम करणाऱ्या बुध्दु चौधरी च्या कानावर पडली त्या मुळे लगेच चौधरी यांनी सदर अंबुलन्सला शासकीय रुग्णालय सिंदखेडराजा येथपर्यत बोलावुन सदर प्रसुती असलेल्या महिलेवर ऊपचार येथील डाँक्टरानी ऊपचार केले.व या ठीकाणी ऊपचार करण्यात येऊन बाळाची व बाळाच्या आईची तबेत चांगली असल्यामुळे त्यांना त्याच अबुलन्सने पुढिल प्रवासास खांडव्याकडे पाठवण्यात आले .हायवे दरम्यान नेहमी होणाऱ्या अपघातात धाऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते बुध्दु चौधरी यांना सुद्धा हि माहिती प्राप्त झाल्या मुळे सदर महिलेवर ऊपचार शासकीय ग्रामीण रुग्णालय या मधील डॉ. आघाव ,अधिपरिचरिका सविता मोरे, काळे,यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्त्यांचा खरोखरच अडचणीत असलेल्या माणसाला मदतीचा हात नेहमी पुढे च असतो बुध्दु चौधरी च्या या सवेंदनशील ऊपक्रमाला सलाम