Home बुलडाणा नांदुरा येथे एकाच्या घरावर छापा मारून 20 अवेध गॅस सिलेंडर सह 49,413...

नांदुरा येथे एकाच्या घरावर छापा मारून 20 अवेध गॅस सिलेंडर सह 49,413 चा मुद्देमाल जप्त ,

520

अमीन शाह

बुलडाणा ,

नांदुरा येथे आज एकाच्या घरावर आज स्थानिक गुन्हा शाखेने कार्यवाही करून 20 अवेध गॅस सिलेंडर सह एका आरोपीस अटक केली आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार

मा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून शे मोबिन शे हनिफ 30 वर्षे, रा नवाबपुरा नांदुरा याच्या राहते घरात पुरवठा निरिक्षक व नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत छापा मारून 20 L P G गॅस सिलेंडर ,कॉम्प्रेसर मशीन आणि वजन काटा सर्व किंमती 49,413/- चा मुद्देमाल जप्त करून hc चांदूरकर यांच्या फिर्याद वरून आरोपीविरुद्ध कलम 285 भा द वि सह कलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल केला.
सहभाग-पोलीस निरीक्षक इम्रान इनामदार, asi राठोड, hc चांदूरकर, pc सतीश, वारुळे, केदार, महिला पो , का , अनुराधा ,चालक राजपूत इत्यादींनी सहभाग घेतला ,