Home रायगड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

130

रक्तदान शिबिरात 106 जणांचे रक्तदान

कर्जत , दि.9 (जयेश जाधव) – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या 399 व्या शिबिरात 106 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अध्यक्ष कै. परेश पांडे व सदस्य कै. जितेंद्र जोशी यांच्या स्मरणार्थ कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील अनंतकाका जोशी प्रतिष्ठानच्या सभागृहात सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत – खालापूरच्या 399 व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर आदी उपस्थित होते. व्यापारी सतीश पिंपरे यांनी आपले 61 वे रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला.
विशेष म्हणजे नेहमी रक्तदान करणारे सुभाष तथा नाना ठकेकर आणि त्यांचे सुपुत्र श्रेयस आणि कन्या प्रांजल यांनी एकत्रित रक्तदान करून या रक्तदान शिबिरात वेगळा विक्रम केला. रक्तसंकलनाचे काम डॉ. प्रियांका तांडेल, राजशेखर नायर, लिसी बानू, सोनाली देसाई, श्वेता खान, श्रीरंग बनसोडे, जगदीश महाजन यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिजित मराठे, संदीप भोईर, सर्वेश गोगटे, बंटी लोवंशी, पंकज शहा, किशोर वैद्य, हर्षद वाडेकर, निलेश परदेशी, आशिष गोखले, रोनक कोठारी आदींनी शिबिर यशस्वी करण्यास मेहनत घेतली.