Home विदर्भ तळेगांवात वक्रांगी केंद्रामुळे नागरिकांना मिळत आहे मोठा दिलासा

तळेगांवात वक्रांगी केंद्रामुळे नागरिकांना मिळत आहे मोठा दिलासा

178

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वक्रांगी च्या ATM मुळे मोठा आधार

वर्धा – सध्या स्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा थंड बसत्यात पडल्या असून सोशल डिस्टनसिंग मुळे बँकेमध्ये सुद्धा वाट पाहावी लागत असल्याने तळेगांव व परिसरातील ग्राहकांना, नागरिकांना वक्रांगी च्या सेवेमुळे मोठा दिलासा मिळत आहे.
तळेगांव हे महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर वसले असल्याने आणि त्यातूनच येथून महत्वाच्या जिल्ह्यांना जाण्यासाठी ची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने येथून आवागमान करीत असतात. आणी त्यातच भरम्हणजे येथील गावाची लोकसंख्या 20 हजाराच्या वर असल्याने या ठिकाणी बँकेचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या सुद्धा जास्त आहे. पण याठिकाणी दोन राष्ट्रीय कृत बँका असून एकाच बँकेचे ATM आहे .त्यामुळे या ATM मधील रक्कम लवकर संपत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पण आता वक्रांगी ने येथे आपली सेवा देणे सुरू केले असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना होताना दिसत आहे.वक्रांगी च्या ATM मुळे ग्राहकांच्या डोक्याचा ताण कमी झाला असून नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
एकीकडे कोरोना मुळे नागरिकांचे व्यवहार प्रभावीत झाले असून दुसरीकडे याच नागरिकांना वक्रांगी मुळे काम करण्यास सोपे झाले आहे. तळेगांव येथील वक्रांगी केंद्र चालक निलेश बोधनकर हे ग्राहकांसाठी सदैव तत्पर राहत असल्याने आणि सोबतच सोशल डिस्टनसिंग चे पालन सुद्धा या वक्रांगी केंद्रावर तंतोतंत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.