Home मराठवाडा धक्कादायक : नांदेडात आणखी चार पाझिटिव्ह रुग्ण सापडले, नांदेडची रुग्णसंख्या ४४ पैकी...

धक्कादायक : नांदेडात आणखी चार पाझिटिव्ह रुग्ण सापडले, नांदेडची रुग्णसंख्या ४४ पैकी ४ मृत्यू

33
0

नांदेड, दि. ९ ( राजेश भांगे )

देगलूर नाका रहेमतनगर रूग्ण संपर्कातील : ३
माहूर नवा रूग्ण :

एकूण रूग्ण संख्या: ४४ (यातील ४ मृत्यू )

-एक रुग्ण माहुरचा
– रहमतनगरचे तिघे जण
– शनिवारी सहा रुग्णांची भर
– बाधितां मध्ये दोन १४ वर्षांची मुले

सकाळी दोन रुग्ण सापडल्या नंतर सायंकाळी पुन्हा चार पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन जण हे रहमत नगरचे असून एक जण माहुरचा आहे.
शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची वाढत चालली असून माहुर मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला,तो बाहेरुन आला होता का किंवा अगोदरच्या कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीयातील तो व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित केले जात आहे.

Unlimited Reseller Hosting