Home बुलडाणा पवित्र रमजान महिन्यात मस्जिद मधून अजाण व उपवासाच्या सहेरी व इफ्तार च्या...

पवित्र रमजान महिन्यात मस्जिद मधून अजाण व उपवासाच्या सहेरी व इफ्तार च्या वेळे ची माहिती लाऊडस्पीकर मधून देण्याची परवानगी मिळावी , दाऊद सेठ कुरेशी ,

360

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद ,

अमीन शाह ,

बुलडाणा , लवकरच आरंभ होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात सर्व मुस्लिम समाज बांधव एक महिना उपवास (रोजे) ठेऊन नमाज पठण करतात रमजान महिन्याला मुस्लिम समाजात विशेष महत्व आहे मात्र या वर्षी करोना या आजाराच्या प्रकोपा मूळे सर्वत्र लोकडाऊन सुरू असून सर्व मुस्लिम बांधव हे आपल्या घरीच नमाज पठण करीत आहेत अनेक मुस्लिम बांधव हे अत्यन्त गरीब असल्या मुळे त्यांच्या घरात वेळ पाहण्यासाठी घडी व मोबाईल नाही या मुळे साखरखेर्डा येथील प्रसिद्ध समाजिक कार्यकर्ते शिक्षण समिती चे अध्यक्ष दाऊद सेठ कुरेशी यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुलडाणा जिल्ह्यातील सर्व मस्जिद मधून अजाण व उपवासाची वेळ सांगण्यासाठी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळावी अशी मांगणी दूरध्वनी व्दारे केली आहे , माननीय मंत्री महोदय नवाब मलिक यांनी सुध्दा तुमच्या मांगणीचा विचार केला जाईल असे उत्तर दिले आहे ,