Home रायगड जिल्हा आपत्ती निवारण निधीला वेणगाव येथील देवस्थानची मदत व अदिवासांना धान्य वाटप

जिल्हा आपत्ती निवारण निधीला वेणगाव येथील देवस्थानची मदत व अदिवासांना धान्य वाटप

126

कर्जत – दि. ११ (जयेश जाधव) – कोविड – १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करत आहेत.

यासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील श्री गजानन, श्री महालक्ष्मी आणि श्री हनुमान देवस्थान यांच्या वतीने जिल्हा आपत्ती निवारण निधीला मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.
कोरोना चे सावट भारत देशावर तसेच पर्यायाने आपल्या महाराष्ट्र राज्यावर येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनासाठी कंबर कसली आहे. शासनास मदत म्हणून करोना आपत्ती निवारण अभियान अंतर्गत जिल्हा आपत्ती निवारण प्रतिसाद निधीस वेणगाव येथील श्री गजानन, श्री महालक्ष्मी आणि श्री हनुमान देवस्थान यांच्या वतीने 25000/- (पंचवीस हजार रुपये) चा धनादेश उपविभागीय अधिकारी (प्रांत) वैशाली परदेशी-ठाकूर यांच्याकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केला.हा उपक्रम राबविल्यानंतर वेणगाव पंचक्रोशीतील आदिवासी कातकरी कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले या वेळी देवस्थानचे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दिपक जोगदंड हे प्रमुख उपस्थित होते देवस्थान ट्रस्टचेअध्यक्ष रंजन दातार, विशाल जोशी,विश्वस्त नितीन गोगटे,खजिनदार दीपक बेहेरे, विश्वस्थ विशाल जोशी उपस्थित होते.