Home मराठवाडा बारामती एॅग्रो लिमिटेडच्या वतीने पाचशे लिटर सॅनिटायझर नांदेड जिल्हासाठी मोफत.

बारामती एॅग्रो लिमिटेडच्या वतीने पाचशे लिटर सॅनिटायझर नांदेड जिल्हासाठी मोफत.

14
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ११ :- जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत जिल्हा प्रशासनाला ५०० लिटर व माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान ला ५० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.आज दिनांक ११ शनिवारी सायंकाळी ६ वाजता ५० लिटर सॅनिटायझर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी जीप उपाध्यक्ष समाधान जाधव,नगराध्यक्ष शीतल जाधव, मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसानी, राकापा चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांनी श्री रेणुका देवी संस्थान चे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर, गट विकास अधिकारी विशाल सिंह चौहान विश्वस्त चंद्रकांत भोपी,यांच्या कडे सुपूर्द केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्स चा तुटवडा आहे.याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत.करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात रहाणे आणि खबरदारी पाळणे एकमेव उपाय आहे. मात्र कामासाठी घराबाहेर पडल्यास करोनाचा संसर्ग टाळावा यासाठी सॅनिटायझर सर्वात उत्तम उपाय आहे.मात्र सध्या सर्वत्र सॅनिटाय झरचा काळा बाजार सुरु झाला आहे. मात्र असे असताना कर्तव्यदक्षतेवर असलेल्या नांदेडकरांसाठी थेट बारामतीने मदतीचा हात दिला आहे.कर्जत जामखेड येथील राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार आणि बारामती एॅग्रो लिमिटेडच्या वतीने पाचशे लिटर सॅनिटायझर नांदेड जिल्हासाठी मोफत पाठवले आहे. तर माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान करीता पन्नास लिटर सॅनिटायझर असलेली माल वाहू गाडी शनिवारी सायंकाळी बारामती येथून सॅनिटायझर घेवून पोहचली असता माहूर येथील राष्ट्रवादीचे नेते माजी जीप उपाध्यक्ष समाधान जाधव,नगराध्यक्ष शीतल जाधव,मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसानी, राकापा चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांनी श्री रेणुका देवी संस्थान चे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर, गट विकास अधिकारी विशाल सिंह चौहान विश्वस्त चंद्रकांत भोपी,यांच्या कडे सुपूर्द केला. या वेळी आरोग्य विभागाचे ईश्वर राठोड,जय कुमार अडकीने,संजय तीवसकर, बालाजी कोंडे,गजानना भारती, सरफराज दोसानी यांची उपस्थिती होती.

खा. शरदचंद्र पवार साहेब, अजित पवार यांच्यापाठोपाठ आता पुढच्या पिढीतील आ. रोहित पवार यांनीही ही परंपरा कायम राखली असून त्यांचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी नांदेड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.