Home विदर्भ महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्ताने स्वतंत्र समता शिक्षक संघ हिंगणघाट समुद्रपूर परिवाराच्यावतीने...

महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्ताने स्वतंत्र समता शिक्षक संघ हिंगणघाट समुद्रपूर परिवाराच्यावतीने गरजूनां अन्नधान्याची किट वाटप.!

22
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – सद्यस्थितीत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात covid-19 या विषाणुने कहर केलेला आहे, अशातच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरीतील काही गोरगरीब, निराधार, बेघर, अंध-अपंग विधवां, लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

अशा कठिण परिस्थितीमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2020 ला थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाच्या पर्वावर स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या वतीने पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल ,एक किलो तूर डाळ, एक किलो साखर ,200ग्रम मिरची पावडर पॉकेट अशाप्रकारे जवळपास पाचशे रुपयाची एक किट तयार करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, माणुसकीचा धर्म निभवत, स्वतःच्या शरीराची काळजी न करता आपल्याला समाजाचे काही देणे आहे आपण समाजाचे पाईक आहोत या उदात्त भावनेने फक्त आणि फक्त गरजु कुटुंबांनाच जवळपास दोनशे किटा घरपोच वाटप करून समाजाप्रती थोडफार ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्यात आला .

अन्नधान्य वाटप उपक्रमाच्या यशस्वी करिता सुनीलजी तेलतुंबडे, शंकरजी निमसरकर, पुष्पराज झिलटे ,राजूभाऊ अवथरे ,विक्रम तामगाडगे ,शरद वासे ,निलेश खरे ,सुभाष ताकसांडे ,ऊर्वेल नगराळे ,सुरेश ढेपे ,राजू मून ,जगदीश कांबळे ,प्रमोद गावंडे ,संजय जवादे, शिक्षा खैरकार, प्रमोद पाटील ,विजय कुंभारे, सतीश फुलझेले ,गंगाधर भगत, रवी ओंकार , नवनाथ थुल राजेंद्र ताकसांडे ,सचिन शंभरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.