Home रायगड कर्जतमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त कोरोना आजारांवर मात करण्यासाठी साकडे

कर्जतमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त कोरोना आजारांवर मात करण्यासाठी साकडे

20
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत शहरातील बाजारपेठेत केसरी अपार्टमेंटमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्तीचे औचित्य साधून आज ओसवाल परिवारातर्फे भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली यावेळी महावीर यांच्या प्रतिमेची सुरेख रांगोळी काढून पूजा करुन विनम्र अभिवादन केले त्यात या रांगोळीत ‘अहिंसा परमो धर्म’ या शांतीचा संदेश देणारे ब्रीद वाक्य लिहिले होते. यावेळी देशात कोरोना आजारांने थैमान घातले या आजारांचा सामना करण्यासाठी देशवासीयांना ताकद देऊन त्यांचे समुळांचा नायनाट व्हावा, यासाठी ओसवाल परिवारातर्फे हात जोडून प्रार्थना करून भगवान महावीर यांच्या कडे साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी मोहनशेठ ओसवाल, हिम्मत ओसवाल व ओसवाल कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.