Home महत्वाची बातमी लॉक डाउन चा फायदा घेऊन रेती तस्करांनी मारला शासनाच्या ताब्यातील रेतीवर डल्ला.

लॉक डाउन चा फायदा घेऊन रेती तस्करांनी मारला शासनाच्या ताब्यातील रेतीवर डल्ला.

90
0

महसूल विभागाच्या जप्त रेती साठ्यातील रेती चोरीला…!

हरीश कामारकर – महागाव

यवतमाळ / महागाव – सध्या कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून महसूल प्रशासन कामाला लागला असून लॉकडाऊन मुळे तालुक्यात सर्व वातावरण शांत आहे. याच संधीचा फायदा उचलत अवैध रेती तस्करांनी रेती चोरण्या सपाटा लावला असून चढ्यादराने रेती विक्री केल्या जात आहे. लेवा परिसरात चोरी करून ठेवलेला रेती साठा महसूल विभागाने जप्त केला होता. त्यासाठ्यातील १० ब्रास रेती आरोपीने चोरून नेली. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील लेवा यांनी महागाव पो स्टे केली असता आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात लॉकडाऊन मुळे सर्व वाहतूक बंद आहे. परंतु काही रेती तस्कर रात्रीच्या वेळी रेती चोरून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती साठा करत आहे. चोरलेल्या रेतीची चढ्यादराने विक्री केल्या जात आहे. महसूल विभाग कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेत सहभागी झाल्याने याच संधीचा लाभ घेत रेती तस्कर आपली पोळी शेकून घेत आहे. तालुक्यातील लेवा परिसरा मध्ये चोरट्या मार्गाने रेतीचा साठा करण्यात आला होता. याची माहिती तहसीलदार निलेश मडके यांना मिळताच मंडळ अधिकारी तलाठी यांच्या समक्ष ३१ मार्च ला ३० ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला होता. परंतु त्यातील १० ब्रास रेती आरोपी आनंदराव मारोती जिरे याने चोरून नेला. याची फिर्याद लेवा येथील पोलीस पाटील श्रीराम देशमुख यांनी महागाव पोलीस स्टेशन ला केली असता आरोपी विरुद्ध चोरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार डी के राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक पवार, गजानन राठोड हे करीत आहे.