Home रायगड कर्जत मधील रक्तदान शिबीरास रक्तदात्याचा प्रतिसाद….!

कर्जत मधील रक्तदान शिबीरास रक्तदात्याचा प्रतिसाद….!

127

कर्जत – जयेश जाधव

“चला कोरोना ला हरवुया , माणूसकी जागवूया”

या संकल्पनेतुन केले शिबीराचे आयोजनमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्य मंत्री मा राजेश टोपेजी याचे आवाहना नुसार कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव प्राश्वभुमीवर,राज्यात जाणवणारा रक्तचा तुटवडा भरुन काढण्यासाठी कर्जत पालीकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश (आप्पा) गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे .आयोजन केले होते .शिबीरास रक्तदात्यानी प्रतीसाद देत हे शिबीर यशस्वी केले .
कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण भोर यानी स्व:ता रक्तदान करून या शिबीराचे उदघाटन केले .या वेळी कर्जत पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील ,रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सब इन्सपेक्टर सिगं ,रेल्वे पोलीस निरीक्षक उबाळे , माजी उपनगर अध्यक्ष वंसत मामा सुर्वे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते .
गूडंगे येथील समाज मंदिरात झालेल्या या रक्तदान शिबिरात युवक- युवतीने सहभागी होउन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले
सोशल डिसंटन्स पाळणे साठी एका वेळी एकाच रक्तदात्यास प्रवेश दिला जाईल अशा सुचना संयोजकानी दिल्या होत्या या सर्व सूचना चे तंतोतंत पालन करत रक्तदात्यानी शिबिरात सहभाग घेतला .सेवा बल्ड बँक डोबीवली च्या तद्य डॉक्टरानी या शिबिरात रक्तसंकलन केले .
सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी , सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले ,सुमन्तू हाँस्पिल चे डॉ सुनिल ढवळे ,डॉ ईश्वरी ढवळे ,उमेश गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच शिवप्रतिष्ठान शाखा गूडंगे ,शिल्पकार यूवक मंडळ गूडगे भीमतरूण मंडळ पंचशिल नगर ,याच्या कार्यकर्ते नी हे शिबीर यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले . सोशल डिस्टन्स पाळणे साठी तीन फुट अतंराचे चौकोन बनवले होते.रक्त दात्याना एका वेळेस सहाजन या प्रमाणे आत सोडले जात होते रक्त संकलन करणारेकर्मचारी ,डॉक्टर हे फक्त हाँल मध्येदिव्याग नागरिक नितीन घोडके यानी सुध्दा रक्तदान करत राष्ट्रीय कर्त्यव पार पाडले.