Home रायगड आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून परप्रांतीय कामगारांची भेट घेऊन केली विचारपूस…

आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून परप्रांतीय कामगारांची भेट घेऊन केली विचारपूस…

240

कर्जत – जयेश जाधव

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून खालापूर औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांची भेट घेऊन विचारपूस केली तर यावेळी
तहसीलदार , मुख्याधिकारी,पोलीस अधिकारी,डॉक्टर्स, नर्सेस , पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते,सफाई कामगार यांचं कौतुक केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी आज खालापूर तहसीलदार यांच्या कडून संपूर्ण तालुक्याची परिस्तिथी जाणून घेतली यावेळी आमदारांनी संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला तदनंतर आमदारांनी खोपोली शहराला भेट दिली यावेळी मुंबईतुन पाणी आंध्र प्रदेशला जाणाऱ्या मजुरांची पूर्ण राहण्याखाण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे त्या जनता शाळा येथे भेट देऊन त्या कामगारांची विचारपूस केली . शहरातील आणि तालुक्यातील गोरगरिबांना अन्नधान्याचा पुरवठा बाबत काही सूचना केल्या .. रेशनिंगचे धान्य सर्वांपर्यंत पोहचवा तर ज्यांचे रेशनिंग कार्ड नाहीत अश्या नागरिकांनाही धान्यासह आदी जीवनाशयक वस्तूंचा पुरवठा झाला पाहिजे अशा सूचना केल्या
यावेळी खोपोली सह तालुक्यात प्रशासनाने जी खरबदारी घेऊन जे नियंत्रण मिळविले आहे त्या बाबत खालापूरतहसीलदार इरेश चपलवार , नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शेटे , खालापूरपोलीस उप अधीक्षक रणजीत पाटील ,खालापूर सिनियर पीआय विश्वजित काईंगडे , खोपोली सिनियर पीआय धनाजी क्षीरसागर , सर्व शासकीय डॉक्टर्स आणि खाजगी डॉक्टर्स , मेडिकल असोसिएशन , नर्सेस ,सफाई कामगार , प्रशासनातील अन्य धिकारी , कर्मचारी , सामाजिक काम करणाऱ्या सर्व संस्था , पत्रकार मित्र , सर्वच राजकीय क्षेत्रात मदत करणारी मंडळी आदींचे आमदार थोरवे यांनी जाहीर कौतुक करून आभार देखील मानले‌.
जनतेने गंभीरतेने या कडे पाहून जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असेल तरच घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे कोरोनाला हरविण्यासाठी जनतेने घरात राहिले तर हे आरोग्याचं युद्ध जनतेच्या संयमाने जिंकता येईल असेही त्यांनी यावेळी शेवटी सांगितले.