मराठवाडा

शासनाचा सुशिक्षित बेरोजगार नर्सेसच्या जिवाशी खेळ – ब्रदर आदी बनसोडे यांचा सरकारशी थेट आरोप

Advertisements
Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. ३१ :- महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाखो नर्सेस उत्तीर्ण होतात, यामध्ये एएनएम,जिएनएम, बिएससी नर्सिंग असे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावे लागते लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामासाठी भन्नाट फिरुन ड्युटी जाॅईन करतात ते पण सात ते आठ हजार महिना काम करतात, २०१६ च्या कोर्ट नियमानुसार खाजगी नर्सेसला दवाखान्याच्या बेड वरुन म्हणजेच विस ते पंचवीस हजार पगार द्यावा असे कोर्ट म्हणतो तो नियम लागू करत नाहीत, आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ भरती करुन पाच हजार महिना काम देतात,मग रजिस्टर नर्सेस कुठे जायचं,लाखो रुपये तिन ते चार वर्ष शिक्षण घेऊन पाच हजारांवर महिना लाज वाटत आहे..

आता महत्वाचे म्हणजे कोरोणा व्हायरस आला आहे सर्व देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले, शेजारच्या देशात आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर स्टाॅफ कोरोणाच्या रुग्णांचा उपचार करुन तेच मरण पावले आहेत, तरीही नर्सेस ड्युटी करत आहेत,

महाराष्ट्रात सरकारी दवाखाने असे आहेत की, तिन तेरा नऊ अठरा वाजलेली परिस्थिती आहे,तातडीच्या वेळी सोईसुविधा उपलब्ध नाहीत, तातडीचे इंजेक्शन नाहीत, डॉक्टर नर्सेस पण जास्तीचे नाहीत हे सरकारला माहिती आहे म्हणून कोरोणा व्हायरससाठी कंत्राठी पद भरती काढलेली आहे ते पण तिन महिन्यासाठीच आणि कोरोणा असे पर्यंत विस हजार पगार देणार, एवढा मोठा भयानक रोगाच्या विरुद्ध नर्सेस आपला जिव धोक्यात घालून तिथे ड्युटी करतात आणि त्यांना फक्त कंत्राठीवर,कामापुरते मामा,नंतर काॅन्ष्ट्राक्ट संपल्यावर वाऱ्यावर जगायचे का? अगोदरचे तुमचे जावई म्हणजे पर्मनंट साठ ते सत्तर हजार पगार वाले ते काय आराम साध्या जनरल वार्ड मध्ये ड्युटी करणार आणि कंत्राटी कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी करायचं, पर्मनंट नर्सेसना कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी लावावेत व कंत्राठी धारकांना इतर वार्ड मध्ये ड्युटी लावा, नाहीतर कंत्राठी ऐवजी पर्मनंट भरती करुन पगार वाढ द्यावा आणि आमच्या नर्सेसना मरणांच्या दारात सोडू नका? अशी विनंती करतो….!!!
नमस्कार
ब्रदर आदी बनसोडे
अध्यक्ष युनायटेड नर्सेस असोशियशन नांदेड

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...