रायगड

नऊ वर्षाच्या चिमुकल्या दुर्वाने केला पोलिसांना सलाम

Advertisements

जयेश जाधव

कर्जत मधील एका शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या नऊ वर्षाच्या चिमुरड्या नातीने सध्या कोरोना विषाणूंचे जागतिक संकट ओढवले आहे पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेचे रक्षण करतात. तिने आपल्या हस्ताक्षराने पोलिसांना पत्र लिहून त्यांना सलाम केला आहे. आपण घरात राहून त्यांना सहकार्य करूया अशी भावना तिने पत्रातून व्यक्त केली आहे.
कर्जत महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या दक्षता समिती सदस्या मीना प्रभावळकर यांची इंग्रजी माध्यमात इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेणारी 9 वर्षाची नात कु. दुर्वा सचिन शेठ हिने काल दि.28 मार्च रोजी कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना पत्र लिहून पोलीस खात्याला सलाम केला आहे. या पत्रात तिने ‘मी सुटी लागली म्हणून कर्जतला आजीकडे आले आणि अचानक सर्व ठिकाणी बंद सुरू झाला याबाबत आजीकडून मला सारा प्रकार समजला त्यामुळे भीती वाटू लागली. टीव्ही वरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे ऐकल्यावर घरा बाहेर पडायचे नाही हे कळले.
आम्ही सारेजण घरात आहोत आणि तुम्ही सर्व पोलीस घराबाहेर राहून सर्वांना लांब राहायला सांगून आम्हाला सुरक्षित ठेवता. हे मी रोज टीव्ही मध्ये पहाते त्यामुळे तुमच्या बद्दल मला नितांत आदर आहे. घरी असल्याने माझा दररोज एक वेगळा उपक्रम असतो. आज लेटर रायटिंग असल्याने तुम्हाला पत्र लिहून तुमचे आभार मानावे असे वाटले. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाला घरी ठेऊन दररोज आमच्या संरक्षणासाठी बाहेर पडता म्हणून तुम्हाला सलाम.’ असे शेवटी लिहिले आहे. हे पत्र मराठी भाषेत लिहिले असून त्यामध्ये तिने सर्रास इंग्रजी शब्द वापरून आपल्या निष्पाप भावना व्यक्त केल्या आहेत.
हे पत्र रायगड पोलिसांनी ट्विट करून ‘दुर्वा सारख्या चिमुरडीने पत्र लिहून आम्हाला सलाम केला आहे. त्यामुळे आमचं जस घरी एक कुटुंब आहे तसेच आमची काळजी घेणार घराबाहेरही संपूर्ण समाजाच एक कुटुंब आहे आणि या सर्वांच पालन करणे हे आमच कर्तव्य आहे. दुर्वा सारखेच आपण घरात राहू या आणि कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करू या. असे म्हटले आहे.
आज दि.29 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी कु. दुर्वा च्या कर्जत येथील निवासस्थानी जाऊन तिला गुलाब पुष्प आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पुस्तक भेट देऊन कौतुक केले.यावेळी तिची आजी मिना प्रभावळकर, आई भाग्यश्री शेठ यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जोगदंड उपस्थित होते.

You may also like

रायगड

यू-टयूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून केवळ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म

अलिबाग , जि. रायगड,दि.13 (जिमाका):- काही व्यक्ती अनधिकृतपणे वृत्तपत्रे प्रकाशित करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ...
रायगड

हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या , “शेकाप नेते पंडीत पाटील यांची मागणी”

श्रीवर्धन तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन….!   उदय वि कळस  –  श्रीवर्धन  उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक ...
रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...