महाराष्ट्र

राज्यपालांची सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा ; नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश

Advertisements
Advertisements

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली.
करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली. सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले.राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...
महाराष्ट्र

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न…!

ठाणे – प्रतिनिधी जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन ...
महाराष्ट्र

शहरी व ग्रामीण पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – विनोद पञे

पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच ...