Home रायगड भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांचे माणुसकीचे दर्शन , पायरमाळ आदिवासी बांधवांना...

भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांचे माणुसकीचे दर्शन , पायरमाळ आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

310
0

कर्जत – जयेश जाधव

कोरोना विषाणूची लागण होऊन आपणही बाधित रुग्ण होऊ शकतो याची खबरदारी शासन दरबारी घेतली जात आहे . म्हणूनच देशव्यापी ” जनता कर्फ्यू ” यशस्वी झाल्यावर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे .याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला असून गोरगरीब , गरजू , हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे . काम नसल्याने , रोजगार अभावी रोजच्या पोट भरण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू विकत कशा घेणार ? लहान लेकरांची पोट कसे भरणार ? या विवंचनेत भुकेली माता , कुटुंबाची गृहिणी असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे . नेरळ परिसरातील कर्जत भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांना या बाबीची कल्पना असल्याने त्यांनी आपल्या शेजारी असलेल्या नेरळ पायरमाळआदिवासी वाडीत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.
नेरळ परिसरातील पायरमाळ आदिवासी बांधवांची वस्ती आहे . येथील सर्वच कुटुंब हातावर कमावणारी आहेत . मात्र कोरोना विषाणूमुळे सर्वच ठिकाणी हाहाकार माजला आहे . सर्व कामकाज जागच्या जागी थांबले आहेत . त्यांना रोजगार उपलब्ध राहिला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .घरात लहान चिली – पिली मुले असल्याने दैनंदिन रोजच्या खाण्याचे सामान खरेदी करण्यास पैसे गाठीशी नसल्याने पोट भरण्याचे संकट उभे राहिले आहे . नेरळ ग्रामपंचायत सदस्य व भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांना नेरळ परिसरातील पायरमाळ आदिवासीवाडी असल्याने त्यांना त्यांच्या ह्या पूर्वापार असलेल्या समस्या माहीत असल्याने त्यांनी आज त्यांच्या घरी जाऊन जीवनावश्यक दैनंदिन वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले .
भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी ग्रामस्थ मंडळ , महिला मंडळ ,व युवा मंडळ यांनी असे आवाहन केले आहे कि , आपणही आपल्या शेजारी , परिसरात , असलेल्या आदिवासीवाडीत , झोपडपट्टीत , ओळखीचे भिकारी जो गोरगरीब आहे , हातावर कमावून पोट भरणारा वर्ग आहे , त्यांना धान्य , खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन मदत करून कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याची ,सामना करण्याची प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे व माणुसकीचे दर्शन घडविण्याचे आवाहन व्यापारी वर्गास , उच्च सोसायटी धारकांस , लोकप्रतिनिधी , राजकीय वर्गास केले आहे . मंगेशभाऊ म्हसकर याच्या रुपाने आदिवासीवाडीत आशेचा किरण उगवला असल्याचे चित्र दिसत आहे .