Home रायगड कर्जतच्या बेबीताई दगडे यांचा अनोखा उपक्रम, बंद काळात गरजूंना मोफत जेवण

कर्जतच्या बेबीताई दगडे यांचा अनोखा उपक्रम, बंद काळात गरजूंना मोफत जेवण

66
0

कर्जत – जयेश जाधव

कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे . या भयंकर आजाराची लागण संसर्गाने इतरांना होऊ नये म्हणून देशव्यापी जनता कर्फ्यू पाळण्यात आला .

तर आत्ता महाराष्ट्रात संचारबंदीच्या बरोबरच जनजीवनच लॉकडाऊन करण्याचे आदेश मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत . हि कोरोना विषाणूची महामारी शहरापासून वाड्या – पाड्यापर्यंत पोहचू नये , म्हणून जिल्हाबंदी – गावबंदी देखील करण्यात आली आहे . पोलीस यंत्रणादेखील १४४ कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहेत . कामगार – कर्मचारी वर्ग देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत .
मात्र कर्जत तालुका हा बहुसंख्य आदिवासी भाग आहे . सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोलमजुरी केल्यावर किंवा लाकूड फाटा , रानमेवा विकून हातावर मिळणाऱ्या रोजगारातून कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्याचा आदिवासी बांधवांचा वर्षेनुवर्षे दिनक्रम असताना या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली असल्याने गाठीशी काहीच पैसे शिल्लक नसल्याने कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी व कोठून शरीरात येणार ? याच विवंचनेत हा वर्ग आहे . रोजगार बंद , जेवायला अन्न नाही , अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपली असताना बेबीताई सारखी देवासारखी माणसे त्यांच्या मदतीला धावून येताना दिसत आहेत . केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे , या उक्तीप्रमाणे स्वतापासून सुरुवात करणाऱ्या सौ . बेबीताई जगदीश दगडे यांच्यासारख्या माऊलीने आदिवासी व गोर गरीब वर्गाची पोटाची खळगी भरण्यासाठी मोफत जेवणाची सेवा चालू केल्याने हे काम महान असून अशीच सेवा इतरांनीही आपल्या परिसरात शासनाचे नियम पाळून करण्याची गरज येऊन ठेपली आहे . शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोटाची खळगी भरणे गरजेचे असल्याने आदिवासी बांधवांना जेवणाची सोय करणारे सौ . बेबीताई व जगदीश दगडे या दांपत्याचे कार्य अनमोल आहे . शासनाचे कोरोनाबाबत नियम पाळत रोज ६० ते ७० आदिवासी बांधव – महिला वर्ग , त्यांची लहान मुले , गोर गरीब , अनाथ भिकारी वर्ग जेवून जात आहेत . हे मोफत जेवण दि . २३ मार्च पासून त्यांनी अविरत चालू केले आहे .
दिशा केंद्र या सामाजिक संस्थेत काम करणारे जगदीश दगडे यांचे काम आदिवासी वर्गात मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे हा वर्ग कसा जगतो याचा पूर्व अभ्यास त्यांना आहे . नेहमीच आदिवासी वर्गाला त्यांचा मदतीचा हात असल्याने त्यांच्या खांद्याला – खांदा लावून त्यांच्या पत्नी सौ . बेबीताई काम करत असताना आताची परिस्थिती पाहून त्यांना हे अनमोल कार्य करण्याची कल्पना सुचली . त्यांच्या या महान कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . आदिवासी बांधवांची पोटाची खळगी भरणाऱ्या या माउलीच्या महान कार्याला सर्वचजण सलाम करत आहेत .