Home विदर्भ जिवती तालुक्यातील शहर व ग्रामीणाचे अनेक गावबंदी

जिवती तालुक्यातील शहर व ग्रामीणाचे अनेक गावबंदी

108

कोरोना धस्ती संसर्गापासून खबरदारी

कोरपना – मनोज गोरे

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आला आहे. याचा पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या रस्ता असा बंद करण्यात आला आहे
जिवती शहरसह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिकांनी गावाचा सिम बंद करून बाहेर गावाच्या नागरीकांसाठी गावबंदी केलेले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गावकऱ्यांतर्फे हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. जिवती तालुक्यातील वणी रस्ता, शेणगाव रस्ता, गडचांदूर रस्ता, पाटण, भारी, येरमीयेसापूर रस्ता, कुंभेझरी व तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाहेर गावातील नागरिकांसाठी गावबंदी करण्यात आला आहे.

यंत्रणे तर्फे दक्षता सुरूच
गावकऱ्यांतर्फे स्वयंस्फूर्तीने गावबंदी करण्यात आला आहे.
या गावामध्ये गावबंदी असला तरीही तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच या तहसील प्रशासनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
नगरपंचायत कडून सुध्दा
कोरोनाबाबत जनजागृती साठी आणि बाहेरगावावरून आलेल्या व्यक्ती ज्यांना होम क्वारेंटाईन केले आहे त्यांच्या घरी भेट देऊन सुचना देण्यात आला आहे.
नगर पंचायत जिवतीच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड,नगराध्यक्षा पुष्पा नैताम, पोलीस प्रशासनाचे अधिकार यांचा उपस्थित मध्ये खबरदारी घेण्यात आला आहे.