Home बुलडाणा सिंदखेडराजा तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट , रस्ते झाले निर्मनुष्य ,

सिंदखेडराजा तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट , रस्ते झाले निर्मनुष्य ,

444

अमीन शाह ,

आज सकाळ पासूनच सिंदखेडराजा तालुक्यातील प्रमुख गाव साखरखेर्डा , मलकापूर पांगरा , दुसरबीड , किंगावराजा , सिंदखेडराजा येथे सर्व रस्ते हे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले , पोलीस प्रशासन हे बाहेर पडलेल्या नागरिकांना काठी चा प्रसाद देत आहे , नेहमी वर्दळीचे गर्दीचे ठिकाण ही ओस पडल्याचे दिसून आले ,

गरिबांवर उपासमारीची पाळी येणार , ?

आज पोलीस प्रशासन किराणा समान , भाजी पाला , अन्न धान्य , घेण्यासाठी बाहेर निघणारया लोकांना विनाकारण मारहाण करीत असल्यामुळे आधीच घाबरलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे करोना या बिमारीने नंतर मरू पण आज उपाशी मरण्याची पाळी आमच्या वर आली आहे असे अनेक लोकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ प्रतिक्रिया देताना सांगितले आहे , प्रशासनाने या गंभीर बाबीचा विचार करून नागरिकांना अन्न धान्य ,दवाखाना , मेडिकल आणण्यासाठी साठी सूट ध्यायी अशी मंगणी होत आहे ,

आरोग्य विभागाने पुणे मुंबई , सुरत , व इतर ठिकाण वरून कामा साठी बाहेर गेलेल्या व तेथून परतलेल्या लोकांची शोध मोहीम राबवून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे ,

पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक ,

आज सकाळ पासूनच पोलीस प्रशासनाने गरीब नागरिकांना घरा बाहेर पडण्यास मज्जाव करीत आहे मात्र कोणी गरीब नागरिक ज्याच्या घरी अन्न धान्य नसेल , किंवा कोना चा दुखत असेल आणि त्याला दवाखान्यात जायचा असेल अश्या गरजू लोकांवर सक्ती करण्यात येऊ नये या लोकांना संचार बंदीतून सूट द्यावी अशी मंगणी सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासना कडे केली आहे ,

संचारबंदीतून सूट ,

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या नुसार किराणा दुकान , अन्न धान्य दुकान , फळ , भाजीपाला , दळनाची चक्की , मेडिकल , हॉस्पिटल , यांना सूट दिलेली आहे ,

——————————————
तहसीलदार येवलीकर ,

आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार येवलीकर यांच्याशी संपर्क साधला असता मी सर्व ठाणेदारां ना फोन करून सांगतो की तालुक्यातील प्रमुख गाव साखरखेर्डा ,मलकापूर पांगरा , दुसरबीड , किंगावराजा , सिंदखेडराजा , येथे थैली घेऊन समान आणणाऱ्या व उपचारा साठी दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांना या संचारबंदीतून सूट देण्यात यावी , नागरिकांनी रस्त्यावर व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर गर्दी करू नये आवश्यकता असेल तरच घर बाहेर पडावे असे ही त्यांनी सांगितले ,
—––———————————
तालुका वैधकीय अधिकारी डॉ , सदानंद बनसोड ,

नागरिकांनी काळजी करू नाही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मुंबई , पुणे , सुरत , व इतर ठिकाण वरून आलेल्या लोकांनी स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी आमची वैधकीय टीम सज्ज असून काही त्रास होत असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी असे त्यांनी सांगितले ,