रायगड

कर्जत बाजार पेठ आज पासून तीन दिवस बंद

Advertisements

जयेश जाधव

कर्जत – आजचे युद्ध हे विषाणूशी युद्ध आहे, कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून त्याचा मुकाबला एकजुटीने करण्याची गरज आहे, जनतेने गर्दी करणे बंद करावे तसेच सरकारच्या सुचनांने काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केले आहे.

एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपले काहीही करू शकत नाही, शासन ज्या – ज्या सूचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. नगरपरिषदेच्यावतीने गर्दी कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहे, नगरपरिषद क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग, हातगाडी संघटना, हॉटेल संघटना, रिक्षा संघटना यांना निवेदन देऊन आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रविवार दि.22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु पाळा असे आवाहन केले आहे, कर्जत व्यापारी फेडरेशन ने नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहना नुसार उद्या दि.21 मार्च व 22 मार्च रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या मध्ये किराणा माल, कपडा दुकान, सोन चांदी दुकान, हार्डवेअर दुकान कटलरी दुकान, हॉटेल व्यवसाय आदींचा समावेश आहे या मध्ये मेडिकल आणि भाजी ची दुकाने वगळण्यात आली आहेत.
शुक्रवारी कर्जत बाजार पेठ बंद असते, आज दि.20 मार्च शुक्रवार असल्याने कर्जत शहरात शुक्रवारचा बाजार भरतो मात्र त्याला बंदी घातल्याने आज दि.20, 21 आणि 22 मार्च रोजी अशी तीन दिवस कर्जत बाजार पेठ बंद राहणार आहे.आज दि20 मार्च रोजी दुपारी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांनी रस्त्यावर बसलेल्या छोट्या छोट्या व्यवसाईकांना पत्रक वाटून उद्या आणि परवाच्या बंद मध्ये सहभागी व्हा असे आवाहन केले.

You may also like

रायगड

यू-टयूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून केवळ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म

अलिबाग , जि. रायगड,दि.13 (जिमाका):- काही व्यक्ती अनधिकृतपणे वृत्तपत्रे प्रकाशित करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ...
रायगड

हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या , “शेकाप नेते पंडीत पाटील यांची मागणी”

श्रीवर्धन तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन….!   उदय वि कळस  –  श्रीवर्धन  उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक ...
रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...