Home महत्वाची बातमी अल्पवयीन मुलीशी दुष्कृत्य करुन प्रेत जमीनीत पुरले

अल्पवयीन मुलीशी दुष्कृत्य करुन प्रेत जमीनीत पुरले

67
0

रवि माळवी

यवतमाळ , दि. २१ :- अल्पवयीन मुलीला आरोपीने पाथरवाडी जंगलात पळवून नेवून तिच्यासोबत दुष्कृत्य केले व ही बाब मुलीने तिच्या घरी सांगु नये याकरीता तिचा गळा आवळुन तिला जिवानीशी मारुन पाथरवाडी जंगल परिसरातच जमीनीत पुरल्याची घटना घडली.
गजानन विठ्ठल भुरके (३२) रा.शंती नगर मुळावा ता. उमरखेड असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक १२ मार्च २०२० रोजी पोफाळी पोलीस स्टेशन हद्दीतील शांती नगर मुळावा येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी ८ वर्षाची मुलगी तिचे गावातील घरुन शाळेत जातो असे सांगुन सायकलने शाळेकरीता गेली. परंतु सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने कुणीतरी अज्ञात ईसमाने तिला पळवून नेले अशा आशयाची तक्रार पिडीत मुलीचे वडीलांनी पोफाळी पोलीस स्टेशनला दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुध्द अप.क्र.९३/२०२० भादंवि कलम ३६३ चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी त्यांचे कडील विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोफाळी पोलीस स्टेशन येथील अधिकारी, कर्मचाीर यांचे विशेष पथके तयार करुन पिडीत व आरोपीचा शोध घेणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखे मधील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, सचिन पवार, श्रीकांत जिंदमवार व त्यांचे पथकातील कर्मचारी तसेच पोफाळी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके दिनांक १२ मार्च २०२० पासुन अहोरात्र पडीत मुलगी व आरोपीचे शोधाकरीता प्रयत्न करीत असतांना सदरच्या पथकांनी आपले कौशल्यपणाला लावून माहीती मिळवीली व तांत्रीक माहीतीचे आधारे मुळावा येथील गजानन विठ्ठल भुरके याचेवर संशय बळावल्याने सदरच्या विशेष पथकाने दिनांक १९ मार्च रोजी त्याचे मागावर असतांना त्याने पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीतील मौजा लोहारा ईजारा या गावी आपल्या ताब्यातील मोटर सायकल टाकुन जंगलात पळुन गेला व आज रोजी तो रोहडा शेत शिवारात दिसुन आल्याची माहिती मिळाल्यावरुन रोहडा शेत शिवारातून विशेष पथकाकडून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देवून यातील पिडीत मुलीसोबत दुष्कृत्य करण्याकरीता तिला पाथरवाडी जंगल परिसरात पळवून नेवून तिचे सोबत दुष्कृत्य केल्याचे व पिडीत मुलीने ही बाब तिचे घरी सांगु नये याकरीता तिचा गळा आवळून तिला जिवानीशी मारुन पाथरवाडी जंगल परिसरातच जमीनीत पुरल्याची कबुली देवून घटनास्थळ दाखविले आहे. आरोपीला पोफाळी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत करीत आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासूनच ग्राम मुळावा येथील ग्रामस्थ व नवयुकांनी पोलीस विभागास मोलाचे सहकार्य केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, गजानन डोंगरे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, विशाल भगत, किशोर झेंडेकर, मो.जुनेद मो.ताज, सुरेंद्र वाकोडे, पंकज बेले तसेच पोलीस अधिक्षक सो. यांचे विशेष पथकातील पोलीस हवालदार सै.साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार व सायबर सेल यवतमाळ येथील सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, दिगांबर पिलवन, अजय निंबोळकर, राजेश जोगळेकर, प्रगती कांबळे व पोलीस स्टेशन पोफाळी येथील चापोहवा रेवण जागृत यांनी पार पाडली.