Home जळगाव कोरोना व्हायस मुळे सहा रेल्वे गाड्या पुन्हा रद्द

कोरोना व्हायस मुळे सहा रेल्वे गाड्या पुन्हा रद्द

129
0

लियाकत शाह

भुसावळ – कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १८ एक्स्प्रेस गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता तर बुधवारी पुन्हा सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दीतून व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सहा गाड्या झाल्या रद्द अप ८२३५५ पटना-मुंबई सुविधा एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन ८२३५६ मुंबई-पटना सुविधा एक्स्प्रेस २० ते ३१ मार्च दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन ०२१११ डाउन सोलापूर-नागपूर विशेष गाडी २२ व २९ मार्चला रद्द करण्यात आली आहे. अप ०२११२ नागपूर-सोलापूर विशेष गाडी २३ व ३० मार्चला रद्द करण्यात आली आहे. डाऊन ०२११३ सोलापूर-नागपूर विशेष गाडी १९ व २६ मार्चला रद्द करण्यात आली आहे. अप ०२११४ नागपूर-सोलापूर विशेष गाडी ही २० व २७ मार्चला रद्द करण्यात आली आहे.