Home रायगड वेणगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

वेणगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

33
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील असणाऱ्या मोठे वेणगाव येथे गेली बेचाळीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो तसेच यंदाच्या वर्षी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु पुण्यतिथी शताब्दी वर्षे असल्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच अखंड हरीनाम सप्ताह असल्याने मोठे वेणगाव येथे दिंडी सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता या दिंडी सोहळ्यात ग्रामस्थ महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तसेच विठूनामाचा गजर करीत दिंडी सोहळा संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीत दीपोत्सव सोहळा झाला या सोहळ्याला शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , आमदार महेंद्र थोरवे,सरपंच अभिषेक गायकर, पंचायत समिती माजी उपसभापती मनोहर थोरवे, वेणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पालकर ,मोहन ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. भागवत धर्म सेवा मंडळ व ग्रामस्थ मोठे वेणगाव यांच्या वतीने हा अखंड हरीनाम सप्ताह पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करीत असतात .

Unlimited Reseller Hosting