Home महाराष्ट्र आई ICU मध्ये असूनही करोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे

आई ICU मध्ये असूनही करोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे

109

राजेश भांगे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या करोनाग्रस्तांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे डोळ्यात तेल घालून दिवसभर झटत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा, मुलाखती, मीडियाशी बोलणं. केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं. करोनाग्रस्त वाढू नयेत यासाठीची खबरदारी घेणं यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तरीही अथकपणे ते राज्यातील करोनाग्रस्तांची चिंता करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होतं आहे.
राजेश टोपे यांच्या आईवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र टोपे यांना आईची भेट घेण्यासाठी मिनिटभराचाही वेळ मिळू शकलेला नाही. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे करोनाचा महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव. हा प्रादुर्भाव रोखण्याचं मोठं आव्हान राजेश टोपे यांच्यासमोर आहे. अशावेळी त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेवत जनतेच्या सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं आहे. त्यांची ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.