Home पश्चिम महाराष्ट्र जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही – बबनराव लोणीकर

जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही – बबनराव लोणीकर

127
0

राजेश भांगे

पुणे – जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी गाडी घेणार नाही कारण; याचे व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे पैसा जनतेच्या तिजोरीतला आहे. असे सांगत परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मी बबनराव लोणीकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना गाडी घेण्यासाठी तीस लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. त्यानंतर आमदारांना याची गरज आहे का, यापासून ते हा पैसा सामान्यांसाठी वापरा, अशा सूचना त्यावर आल्या आहेत. त्यावर बबनराव लोणीकर यांनी वेगळाच मार्ग शोधला आहे. त्यांनी हे तीस लाख रुपये घेणार नाहीत.
जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी गाडी घेणार नाही कारण, याचे व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे पैसा जनतेच्या तिजोरीतला आहे….!! मला जनतेच्या पैशाने किंवा सरकारच्या पैशाने गाडी खरेदी करायची नाही, मी घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, मी सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून, ज्या जनतेने विश्वासाने २०१४ व २०१९ विधानसभा निवडणुकीत मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. राज्यात सत्ते मध्ये असलेल्या महा आघाडी सरकार ने विधानसभा आमदाराना गाडी खरेदी साठी ३० लाख रुपयाचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.