Home विदर्भ “महिलांचे स्वातंत्र्य व अधिकाराचे जतन करणे, हि सामाजिक जबाबदारी” – डॉ. सुप्रभा...

“महिलांचे स्वातंत्र्य व अधिकाराचे जतन करणे, हि सामाजिक जबाबदारी” – डॉ. सुप्रभा यादगीरवार

144
0

अमोलकचंद महाविद्यालयात महिला दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न…!

यवतमाळ – “महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार थांबायला हवे. महिलांचे स्वातंत्र्य व अधिकाराचे जतन करणे, हि सामाजिक जबाबदारी आहे”, असे प्रतिपादन अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुप्रभा यादगीरवार यांनी केले. अमोलकचंद महाविद्यालय आणि अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महिला सप्ताहाचे औचित्य साधून “महिलांचे आरोग्य शिक्षण आणि अधिकार” यावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्रिती काबरा, अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुप्रभा यादगिरवार, महिला पोलीस कक्षाच्या विजया पंधरे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. एन. एन. पुराणिक, प्रा. अंजली दिवाकर, समन्वयक डॉ एस. एस. गुप्ता तर अध्यक्षस्थानी डॉ आर एम मिश्रा उपस्थित होते.
तीन सत्रामध्ये चाललेल्या या चर्चासत्रांमध्ये डॉ प्रिती काबरा यांनी महिलांच्या पीसीओस व अॅनिमिया यावर मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ सुप्रभा यादगिरवार यांनी “विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम २०१६” तसेच “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा” यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
श्रीमती विजया पंधरे यांनी मुलींच्या छेडछाडी संदर्भात कायदेशीर तरतूदी तसेच स्वसंरक्षणाचे धडे उपस्थितांना दिले.
उद्घाटनपर कार्यक्रमात डॉ एन एन पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ आर एम मिश्रा यांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस एस गुप्ता यांनी केले.
यावेळी दोनही महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थीनी, विद्यार्थी, तीस शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी सोनाली जाधव, नेहा शेख, भाग्यश्री खडसे या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साक्षी क्षिरसागर यांनी केले.