Home पश्चिम महाराष्ट्र महिला दिनाला पुण्यातल्या एका पुरूषाला सर्वोत्कृष्ट आई म्हणुन गौरवण्यात येणार आहे

महिला दिनाला पुण्यातल्या एका पुरूषाला सर्वोत्कृष्ट आई म्हणुन गौरवण्यात येणार आहे

27
0

अमीन शाह

आज आपण महिला दिन साजरा करत आहोत,पण या महिला दिनाला पुण्यातल्या एका पुरूषाला सर्वोत्कृष्ट आई म्हणुन गौरवण्यात येणार आहे. असं काय केल आहे या पुरूषाने ? खरतरं मुलं दत्तक घेताना कोणताही पालक एका सुदृढ बाळाची निवड करेल, पण पुण्याच्या आदित्य तिवारीने चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार आहे. हा आजार झालेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. आदित्यने एकट्याने आपल्या बाळाची काळजी घेतली आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्याला आज महिला दिनी ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आदित्यने ४ वर्षांपुर्वी म्हणजे २०१६ साली २२ महिन्याच्या अविनिशला दत्तक घेतलं.आदित्यने आपली इंजिनियरची नोकरी सोडली आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या अविनिशची जबाबदारी उचलली. ‘स्पेशल’ मुलांच्या आईवडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आदित्यच्या लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वसाठी वेगळा विभाग नाही. सरकारसुद्धा अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देत नाही. म्हणून आदित्यने ऑनलाईन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे आणि मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात येत आहे.

आजपर्यंत आदित्य आणि अविनिश यांनी मिळून तब्बल २२ राज्यांची सफर केली आहे. जवळजवळ ४०० ठिकाणी सभा आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील १०,००० पालकांशी जोडले गेलेलेआहेत. महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्राने आदित्यला या विषयावर झालेल्या परिषदेत भाग घेण्याचं निमंत्रण दिलं होतं.

आज महिला दिनाच्या निमित्ताने त्याला एका कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट आई म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. जितक्या सक्षमपणे आई आपल्या लेकराला सांभाळते , तितक्याच सक्षमपणे किशोर अविनिशची आई झाला,त्याच्या या मातृत्वाचा आज होणारा गौरव म्हणजे त्याच्या कार्याची खरी पोचपावती आहे.