Home महत्वाची बातमी जागतिक महिला दिनीच तरुणीवर बलात्कार; खामगाव येथील धक्कादायक घटना

जागतिक महिला दिनीच तरुणीवर बलात्कार; खामगाव येथील धक्कादायक घटना

57
0

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीला चारचाकीमध्ये बसवून बलात्कार केल्याची घटना खामगाव येथे घडली आहे.

अमीन शाह

बुलडाणा – खामगाव येथील चोवीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगभरात सर्वत्र ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना, माणुसकीला काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे. विवाहित रस्त्यावर उभी असताना तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने चारचाकीमध्ये बसवून तिला नशेचे औषध दिले आणि शेगाव रस्त्यावरील शेतात नेऊन गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने बलात्कार केला.

तीन तरुणांसह गाडीत एक अजून महिला देखील होती. तीन पुरुष आणि एक महिला असे चार आरोपी आहेत. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.