पोलीस मधधुंद असल्याची चर्चा….!!
अनिल बोराडे
पिंपळनेर – दि. . 8 :- पिंपळनेर नवापुर रस्त्यावर सुहरी हॉस्पिटल समोर मोटर साईकल स्वार अचानक मधे आल्याने पोलीस व्हॅन क्र. MH 18 AF 0149 नवापुर रस्त्याकडून येत असतांना ताबा सुटल्याने तीन पल्टी खावून रस्त्याच्या कडेच्या शेतात पल्टी झाली. यावेळी जेवना नंतर फिरनाऱ्याची वर्दळ असते यावेळी अहिरराव दामपंत्य थोडक्यात बचावले. यावेळी घटना स्थळावरील नागरींकांच्या चर्चेतुन मध्यधुंद अवस्थेत पोलीस असल्याचे सांगीतले जात होते. त्यात चालक पो.काँ. दिलीप बापु मोरे (वय- 29 वर्ष) हे जखमी झाले. गाडीत दोन कर्मचारी असल्याचे समजते त्यांना ग्रामिण रुग्णालयात उपचार करुण पुढे हलविण्यात आले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. पोलीस व्हॅनचे पुर्ण नुकसान झाले.
घटनास्थळी व ग्रामिण रूग्णालयात उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी चौकशी केली असता संबंधीत पोलीस अवघ्या 15 मिनिटात तेथुन उपचार घेवून गेल्याचे समजले. संबंधित पोलीसाची वैद्यकिय तपासनी करण्यात यावी अशी मागनी पी.एस. आय. हंडोरे यांच्या कडे केली. घटनास्थळी उपसपंच यांच्याशी पोलीस कर्मचारी यांनी हुजत घातली असे उपसरपंच यांनी सांगीतले. या संदर्भात विजय गांगुर्डे यांनी एस.पी. कार्यालयाशी व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मा.आ. अनिल गोटे यांच्याशी दुरध्दनी द्वारे संपर्क साधून चौकशीची मागनी केली आहे.