Home रायगड पत्रकार सचिन यादव यांच्यावर भ्याड हल्ला करणार्या गावगुंडावर गुन्हा दाखल

पत्रकार सचिन यादव यांच्यावर भ्याड हल्ला करणार्या गावगुंडावर गुन्हा दाखल

188
0

कर्जत , दि. ०७ :- खोपोली येथील पत्रकार सचिन यादव यांच्यावर भ्याड हल्ला करणार्या पाच गावगुंडावर खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार सचिन यादव हे खोपोली बाजारपेठेतील कैलास प्रिंटर येथे कामानिमित्त गेले असताना त्यांनी दि २/३/२०२० रोजी फेसबुक व ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून जगन्नाथ निवृत्ती ओव्हाळ (रा. विहारी,ता खालापूर) यांने गैरकायद्याची मंडळी जमवून हाताबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच सुहेश जगन्नाथ ओव्हाळ, सुबोध जगन्नाथ ओव्हाळ यांने पत्रकार यादव यांच्या डोक्यात कुंडी मारून व हातातील वजनदार वस्तूने मारून गंभीर दुखापत केली आहे.
याबाबत जगन्नाथ ओव्हाळ, सुबोध ओव्हाळ,सुहेश ओव्हाळ, संकेत साळुंके, यांच्याविरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०२० भा.द.वि कलम १४३,१४७,१४९,३२३,३२४ प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक पंकज खंडागळे हे करीत आहे.