रायगड

कर्जत नगर परिषदेची “सुवर्ण कन्या योजना”

कर्जत :- जयेश जाधव

कर्जत नगर परिषदेने सुवर्ण कन्या योजना तयार केली असून कर्जत नगर परिषद हद्दीतील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली.
नगरपरिषद हद्दीतील पिवळे रेशन कार्ड धारक बी. पी. एल यादीत नाव समाविष्ट असलेल्या नागरिका करिता महिला बाल कल्याण अंतर्गत “सुवर्ण कन्या योजना” सुरू करण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ हा जी माता कन्या रत्नास जन्म देईल त्या मातेस कन्येच्या पुढील आहाराकरिता व औषधोपचाराकरिता एक रक्कमी 5000 (पाच हजार ) रुपये इतकी रक्कम आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. या करिता सदर मातेने नगरपरिषद हद्दीत वास्तव्याचा पुरावा व बँक खात्याचा तपशील अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752