Home उत्तर महाराष्ट्र माजी सैनिकावरील खोटा ऑट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची शंभुसेनेची मागणी

माजी सैनिकावरील खोटा ऑट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची शंभुसेनेची मागणी

200

अहमदनगर / श्रीगोंदा , दि. १९ :- श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे रहीवाशी असलेले माजी सैनिक श्री.संजय शेळके यांच्यावर दाखल झालेला खोटा ऑट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक , श्रीगोंदा पोलीस स्टेशनसह श्रीगोंदा तहसीलदार यांना शंभुसेना संघटना,एरंडोली ग्रामस्थ व माजी सैनिक यांच्या वतीने निवेदनासह एरंडोली ग्रामपंचायतीचा ठराव देण्यात आला.

प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माजी सैनिक संजय शेळके यांच्यावर कुठलेही कारण नसताना संबंधित व्यक्तीने फक्त वैचारीक, राजकीय मतभेद व द्वेषापोटी ऑट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. संजय शेळके हे भारतीय सैन्य दलात 28 वर्ष उत्कृष्ट अशी देशसेवा करुन निवृत्त झालेले आहेत. शिवाय सेवा निवृत्तीनंतर सुद्धा ते सदैव सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत तरी अशा निष्कलंक, प्रामाणिक देशभक्त व माजी सैनिकाविरुद्ध ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे म्हणजे खूपच आश्चर्यकारक व वेदना देणारी घटना आहे यात नक्कीच संबंधित फिर्यादीचा काहीतरी स्वार्थी हेतू अथवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असावा अशी माहिती शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी प्रसिद्धि पत्रकात दिली आहे.

सदर गुन्ह्याची सखोल चौकशी करून माजी सैनिकास तात्काळ मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना एरोंडली ग्रामस्थांनी सदर फिर्यादीने यापूर्वीही अनेकदा ऑट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केल्याचे सांगत त्यात तो यशस्वी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच हे कट-कारस्थान निव्वळ सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणारे असल्याने या प्रकरणाची सखोल व सविस्तर चौकशी करून अशा समाज विघातक व्यक्तीस आवर घालून संबंधित फिर्यादी वरच माजी सैनिकाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देताना शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के, शंभुसेना अ.नगर जिल्हाध्यक्ष सागर जठार, एरंडोली गावचे सरपंच बाळासाहेब जगताप, उपसरपंच संजय इथापे पाटील, पेड़गावचे उपसरपंच देवीदास शिर्के
माजी सैनिक भाऊसाहेब इथापे, सुनिक इथापे, मनसेचे विजय कुसळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय खेतमाळीस, शंभुसेना संघटनेचे लक्ष्मीकांत शिर्के, आनंदजी जयस्वाल, मारुतीराव ठाकूर, विष्णू गावडे, मच्छिंद्र इथापे, राहुल जगताप, सुभाष इथापे, तुकाराम मोरे, राजेंद्र इथापे, अविनाश जठार, विशाल इथापे, अजित मोरे, दत्तात्रय इथापे, राहुल पवार, भरत इथापे, शंकर शेळके, संदीप इथापे, अशोक भंडारे, रवींद्र शेळके, सुनील इथापे, आदीसह असंख्य माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.