Home मराठवाडा व्हेरॉक पॉलिमरने त्या ४८ कामगारांना परत कामावर घ्यावे.

व्हेरॉक पॉलिमरने त्या ४८ कामगारांना परत कामावर घ्यावे.

28
0

रवि गायकवाड

औरंगाबाद / बिडकीन , दि. १९ :- पैठण तालुक्यातील बिडकीन येथील चितेगाव औद्योगिक वसाहतींमधील फारोळा येथील व्हेरॉक पॉलिमर व्यवस्थापनने काढलेली ४८ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी आग्रही मागणी सिटु कामगार युनियनच्या वतीने कामगार करण्यात आली.औरंगाबाद मजदुर युनियन सिटुचे अध्यक्ष लक्ष्मन साक्रुडकर,सचिव उद्धव भवलकर,यांनी निवेदनात म्हटले आहे.कंपनीत गेल्या महिन्यात सिटुची युनियन स्थापन करण्यात आली.समेट अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्तासमोर ४८ कामगारांना नोकरीत कायम करण्याबाबत व पगारवाढीचे प्रकरण सुरु होते.सहाय्यक कामगार आयुक्तांनी व्यवस्थापनाला २९ जानेवारी रोजी नोटिस पाठवुन संबधित कामगारांना कामापासुन वंचित ठेवु नये.त्यांच्यावर कार्यवाही करु नये असे कळवु नये असे कळवले होते.माञ,या नोटिसीला न जुमानता व्यवस्थापनाने एक फेब्रुवारीला ४८ कामगारांना कामावर घेतले नाही.प्रकरण समेट कार्यवाही साठी दाखल केल्यानंतर औद्योगिक कलम कायदा १९४७ अंतर्गत संबधित कामगारांना कामावरुन कमी करता येत नाही.

कंपनी व्यवस्थापनाने नविन कामगारांना कामावर घेतले असुन बाब बेकायदेशीर आणि निंदनीय अशी आहे यासंदर्भातही सिटु युनियनने ३३(ए)अंतर्गत प्रकरण दाखल केले आहे.४८ कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे अन्यथा व्यवस्थापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.

Unlimited Reseller Hosting