Home रायगड विद्यार्थ्यांनी स्वतःचा आदर्श निर्माण करावा – पी वि चिर्लेकर सर

विद्यार्थ्यांनी स्वतःचा आदर्श निर्माण करावा – पी वि चिर्लेकर सर

139

गिरीश भोपी

आवरे , दि. १७ :- शालेय स्तरावर विद्यार्थीचे विशेष म्हणजे सर्व गुण याना विकसित चालना होय विद्यार्थी हे संस्कारक्षम असतात विद्यार्थिची मानसिकता ही फक्त अभ्यासक्रम या व्यतिरिक्त विविध विशेष नैपुण्य गुण मिळविण्यासाठी जावी आणि शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यां चा सर्वांगीण विकास होय,

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे ज्याने प्राशन केले तो खरोखरच जीवनाच्या बुद्धिबळ पटावर जिंकल्या शिवाय राहणार नाही निमित्त होते रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे विद्यार्थ्यांना चा बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभंचिंतन सोहळा विद्यार्थीनी परीक्षा आणि परीक्षा पद्धती याचा सखोल अभ्यास करावा असे भेंडे सर म्हणाले सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक एस. एस. भेंडे सर ,पी. व्ही. चिर्लेकर सर ,एन .एम. गावंड सर, एन. एस. पाटील सर ,व्ही. एम. गावंड सर , एम. ए .म्हात्रे सर आणि एस. आर .म्हात्रे सर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पेन आणि सुमन ह्या भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस आर म्हात्रे सर यांनी केले अश्या प्रकारे रामचंद्र म्हात्रे विद्यालयात बारावीच्या विद्यार्थी चा शुभचिंतन सोहळा पार पडला.