Home रायगड चोचिंदे येथे श्री नरहरी महाराज पुण्यतीथी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न…!!

चोचिंदे येथे श्री नरहरी महाराज पुण्यतीथी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न…!!

103
0

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. १३ :- मंगळवारी चोचिंदे येथील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे महाड, पोलादपूर व माणगांव तालुक्यातील सुवर्णकार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी प पालखी सोहळा मोठया उत्साहात पार पाडला.
यावेळी कार्यकारीणी अध्यक्ष दिगंबर नगरकर, सचिव प्रदिप चिखलकर, उपाध्यक्ष प्रदिप नगरकर, महासंघ संदस्य डॉ. संतोष चिखलकर, महासंघ समिती सदस्य संतोष चिखलकर, सल्लागार वसंत नगरकर, सुभाष सागवेकर, महिला मंडळाच्या शुभांगी सागवेकर, मुग्धा सागवेकर आदी मान्यवरांसह महाड, पोलादपूर व माणगाव तालुक्यातील समस्त सुवर्णकार समाज मोठया संख्येने उपस्थित होता.
यावेळी मंदिर परिसरात मंडप घालून आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यांत आली होती. सकाळी रितेश सागवेकर, बिरवाडी या उभयतांस अभिषेक व पुजेचा मान देण्यांत आला. त्यानंतर ध्वजारोहण तर हभप प्रदिप महाराज मेस्त्री यांचे भजन दिंडी बरोबर, पुष्पवृष्टी व आरती, सत्कार समारंभ, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ त्यानंतर हभप विजय पालकर यांचा भजन यावेळी पार पडला.
महाड शहरातून पुढे चोचिंदे येथील मंदिरापर्यंत क्षेत्र बाजीरे येथील सद्गुरू बळीराम नाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व दिगंबर नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यतिथी व पालखी सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

Unlimited Reseller Hosting