Home जळगाव रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर

रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर

65
0

रावेर – शरीफ शेख

रावेर , दि. १३ :- तालुका माध्यमिक पतपेढीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारीणी गठीत करून पदाधिकार्याचा सत्कार करण्यात आला.
राज्यध्यक्ष अतुलभाऊ शेटे (महाविद्यालयीन कर्मचारी शिक्षक सेना) यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली. यावेळी मंचावर जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर भाऊ तायडे, जिल्हाकार्याध्यक्ष गोविंदा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष नाना पाटील,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप पवार जिल्हासंघटक प्रदिप हिरोळे, तालुकाध्यक्ष बोदवड संदीप तायडे उपस्थित होते. जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री. नवल चौधरी यांच्या सूचनेनुसार रावेर तालुका माध्यमिक सेना गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष मुबारक उखर्दू तडवी (कुसुम्बा) , उपाध्यक्ष शशिकांत माधव पाटील (मोरगाव), उपाध्यक्ष कृष्णा शामराव धंदेरे (विवरा) कार्याध्यक्ष संदीप पंडित लाड (वाघोड) सचिव गोकुळ बाबूराव भोई (निंभोरा) सहसचिव विजय पुंडलिक भालेराव (आभोडा) प्रसिद्धीप्रमूख विशाल रमेश राठोड( रावेर) कोषाध्यक्ष सुधीर मधुकर सैतवाल (केरहाला) सदस्य प्रशांत मधुकर पाटील, मनीष जगनाथ नाईक, अरुण सीताराम कोळी, अशोक प्रेमसिंग पाटील, जितेंद्र आत्माराम चौधरी, अशोक पंढरीनाथ महाजन, सुनील देवराम पाटील, धोंडू रामचंद्र पाटील, दिलीप सोपान राऊत, अजित समशेर तडवी, रतन भगवान भोई, प्रदीप विश्वनाथ पाटील, बबलू बाबू तडवी, प्रशांत कडू पाटील, अली हैदर खान अजमल खान, कैलास हरी पाटील, शेखरबाबू खुदाबक्ष तडवी यांची निवड करण्यात आली. बैठकीत सूत्रसंचालन प्रदीप भोई यांनी केले तर आभार अध्यक्ष मुबारक तडवी यांनी केले.

Unlimited Reseller Hosting