गुन्हा दाखल , ग्रामसेवक संघटनेकडून निषेध
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही : – पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्व्हे करण्यासाठी गेलेले दिव्यांग ग्रामसेवक सवडतकर यांच्या मोटार सायकलला धक्का देवून खाली पाडली आणि कॉलर पकडून मारहाण केली या घटनेच्या व्हायरल व्हिडिओ वरून व लेखी तक्रारी वरुण गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ग्रामसेवक संघटनेकडून जाहीर निषेध करण्यात आला ही घटना असोला येथे २२ मे रोजी सकाळी घडली .
तक्रारी चमध्ये नमूद करण्यात आले आहे की खली तालुक्यातील असोला बु येथे ग्रामपंचायत अधिकारी या पदावर संतोष सवडतकर हे काम करत आहेत . ते एका डोळ्याने आणि हाताने अपंग आहेत. ते गेल्या १० वर्षापासून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल योजनेचे काम पाहत असल्याने गेल्या १५ दिवसापासून असोला बु गावातील ऑनलाईन सिस्टीमने अपात्र केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेत पात्र करण्यासाठी सर्वेक्षण चे काम सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी गावातील रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याची तक्रार गावातील एका इसमाने गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची चौकशी सुध्दा करण्यात आली होती. याचाच राग मनात घरून आरोपीने दिनांक २२ मे रोजी सकाळी ८.३० वा असोला येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल योजनेचे सर्वेक्षण करीत असताना दुपारी २ ते २.३० वा. दरम्यान गावातील अलताफ खा उस्मान खा यांचे घराचे घरकुलाचे सर्वेक्षण करते वेळी तेथे जाफर खा आमद खा हा तेथे आला आणि म्हणाला की, तु इकडे येवुन सर्वे का करतो असे म्हणुन त्यांने मोटारसायकलवरुन खाली ओढले आणि शिवीगाळ करीत कॉलर पकडून मारहाण करीत गल्लीतून लोटत नेले . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला यावेळी गावातील खालीक इल्यास पटेल यांनी भांडण सोडविले. हा प्रकार पाहून ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भगवान डोंगरदिवे यांनी लगेच धाव घेवून ग्रामसेवक सवडतकर यांना सोबत घेऊन अंढेरा पोलीस स्टेशन गाठले . या घटनेची सविस्तर तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली .अशा तक्रारी वरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी विरुद्ध कलम १३२,११५ ( २) ,३५१ B N S नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Post Views: 525