अमीन शाह
बुलडाणा
सर्वोच्च न्यायाल्यातील न्यायमूर्ती भूषण गवई व् प्रसन्न वराले यांच्या बुलढाणा येथील कोनशिला कार्यक्रमाला येत असताना देऊळगाव येथील न्यायाधिश शैलेश कंठे यांना रस्त्यातच हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे.
न्यायाधीश शैलेश कंठे यांना छातीत अचानक कळा सुरू व्हायला लागल्या. दरम्यान त्यांना देऊळगाव मही येथील डॉ. सचिन सोनसळे यांच्याकडे दाखविण्यात आले परंतु त्यांनी तात्काळ चिखली येथे हलविण्याचे सांगितले.
चिखली येथील हॉस्पिटलला भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
श्री शैलेश कंठे हे देऊळगावराजा येथील दिवानी न्यायाललंय कनिष्ठ स्तर चे न्यायाधिश म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.